खुशाल शिट्ट्या फुंका, पण हिशोब ठेवा!

खुशाल शिट्ट्या फुंका, पण हिशोब ठेवा!

Published on

खुशाल शिट्ट्या फुंका; पण हिशेब ठेवा!
निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना ‘इशारा’
विरार, ता. ३१ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे (बविआ) अधिकृत चिन्ह असलेल्या ‘शिट्टी’चे दरही प्रशासनाने निश्चित केले आहेत. त्यामुळे प्रचारात कितीही शिट्ट्या वाजवल्या तरी त्याचा इत्थंभूत हिशेब उमेदवारांना आता आयोगाला द्यावा लागणार आहे.

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी प्रचारात वापरल्या जाणाऱ्या शेकडो वस्तूंची दरसूची प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या साध्या चहापासून ते थेट मटण-मच्छी थाळीपर्यंत आणि गुलाल- हार-तुऱ्यांपासून ते प्रचारासाठी लागणाऱ्या शिट्टीपर्यंतचे दर ठरवून दिले आहेत. वसई-विरारमध्ये ‘शिट्टी’ हे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख चिन्ह असल्याने प्रचारात शिट्ट्यांची मोठी खरेदी होते, त्यामुळे आयोगाने या खर्चावर लक्ष केंद्रित केले आहे.

केवळ शिट्ट्याच नव्हे, तर प्रचारात वापरले जाणारे मंडप, लाइट आणि अगदी कार्यकर्त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा हिशेबही आता ‘कॅश’ होणार आहे. बविआचे कार्यकर्ते प्रचारात मोठ्या उत्साहात शिट्ट्या फुंकतात; मात्र यंदा या उत्साहाचा खर्च उमेदवाराच्या अधिकृत खर्चात जोडला जाणार असल्याने उमेदवारांना अधिक सावध राहावे लागणार आहे.

खर्चाचे गणित
खर्च मर्यादा : महापालिका निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ११ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा आहे.
बँक खाते : निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल.
दैनंदिन अपडेट : निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर दररोजच्या खर्चाची नोंद करणे बंधनकारक आहे.
निकालाचा कालावधी : निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ३० दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशेब निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागेल.

प्रचारातील ‘या’ गोष्टींचा हिशेब द्यावा लागेल
खाद्यपदार्थ व पेय प्रचाराचे साहित्य इतर व्यवस्था
चहा, कॉफी, पाण्याचे जार शिट्टी, टोपी, बिल्ले जाहीर सभेसाठी मैदान भाडे
व्हेज, अंडा, चिकन बिर्याणी मफलर, हार, गुलाल प्रचार कार्यालय भाडे
चिकन, मटण, मच्छी थाळी संगणक, खुर्च्या, फॅन महागाड्या गाड्या व इंधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com