मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गो-हे येथे शेतकरी मेळावा संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गो-हे येथे शेतकरी मेळावा संपन्न

Published on

गोऱ्हे येथे शेतकरी मेळावा उत्साहात
वाडा, ता. ३१ (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गोऱ्हे येथे जिल्हा परिषद पालघर व पंचायत समितीच्या वतीने मंगळवारी (ता. ३०) शेतकरी मेळावा पार पडला. यात शेतकऱ्यांना धान खरेदी, पीक विमा आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती देत आधुनिक शेतीचे आवाहन केले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, हा मेळावा त्यांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

Marathi News Esakal
www.esakal.com