मुरूड बीचला ‘ब्लू फ्लॅग’ नामांकन मिळवणार : अदिती तटकरे
मुरूड बीचला ‘ब्लू फ्लॅग’ नामांकन मिळवणार : आदिती तटकरे
पदग्रहण सोहळ्यात विकासाचा निर्धार; पर्यटनाला चालना
मुरूड, ता. ३१ (बातमीदार) : मुरूड ही पर्यटननगरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवावी, पर्यटकांचा ओघ वाढावा आणि स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुरूड बीचला ‘ब्लू फ्लॅग’ नामांकन मिळवून देण्यात येईल, असे ठाम प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी केले. मुरूड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांच्या पदग्रहण समारंभात त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
या वेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, मुरूड तालुकाध्यक्ष फैरोज घलटे, ज्येष्ठ नेते मनोज भगत, मुख्याधिकारी सचिन बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेवक व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
भाषणात आदिती तटकरे म्हणाल्या, की आगामी काळात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभारातून मुरूडचा विकास साधला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मुरूडकर जनतेचे आभार मानत सर्वधर्मसमभाव जपण्याचा संदेश दिला.
पदभार स्वीकारताना नगराध्यक्ष आराधना दांडेकर म्हणाल्या, की मुरूड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य आणि महिला सशक्तीकरणाला प्राधान्य दिले जाईल. जनतेने दाखवलेला विश्वास कायम जपण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
मुरूडसाठी निर्णायक टप्पा
ब्लू फ्लॅग हे आंतरराष्ट्रीय मानांकन स्वच्छता, सुरक्षितता, पर्यावरणपूरक सुविधा आणि समुद्रकिनाऱ्याच्या शाश्वत व्यवस्थापनावर आधारित आहे. श्रीवर्धन बीचप्रमाणे मुरूड बीचला हे मानांकन मिळाल्यास शहराच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. प्लॅस्टिकमुक्त किनारा, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यटकांसाठी सुविधा आणि सुरक्षितता या बाबी प्रभावीपणे राबविल्यास मुरूडचे पर्यटन नकाशावरील स्थान अधिक बळकट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

