ठाण्यात वर्षभरात ३ हजार २६४ आपत्तीजन्य घटना

ठाण्यात वर्षभरात ३ हजार २६४ आपत्तीजन्य घटना

Published on

ठाण्यात वर्षभरात ३ हजार २६४ आपत्तीजन्य घटना
तातडीने पालिकेच्या आपत्ती विभागाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध आपत्तीजन्य परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जात नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तीन हजार २६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाणे पालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन विभाग यांच्यातील समन्वयामुळे बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्यात आले. कार्यशाळा, सार्वजनिक बांधकाम, घनकचरा, विद्युत, वृक्षप्राधिकरण, मलःनिस्सारण, पशुवैद्यकीय व आरोग्य विभागांसह महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती कार्यालये, पोलिस व जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ व टीडीआरएफ यांच्या सहकार्याने अनेक आपत्तींचे यशस्वी निवारण करण्यात आले. वर्षभरात घडलेल्या गंभीर घटनांमध्ये नागरिकांचे प्राण वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले. पाचपाखाडी येथील बहुमजली इमारतीतील आग, कॅडबरी पुलाजवळील अपघात, मुंब्रा बायपास परिसरातील डोंगरात अडकलेली मुले, नाल्यात पडलेली व्यक्ती, रेल्वे ट्रॅकखाली अडकलेली व्यक्ती आणि कोळशेत येथील उंच इमारतीवरील संकटग्रस्त व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. मान्सून काळात सखल भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी कायमस्वरूपी पंपांच्या सहाय्याने तातडीने पाण्याचा उपसा करण्यात आला. मासुंदा तलाव व मारुती रोड परिसरात मोठ्या सक्शन पंपांच्या माध्यमातून निचरा केल्याने संभाव्य नुकसान टळले.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत विविध यंत्रणांच्या सहभागातून मॉकड्रिल व रंगीत तालीम घेण्यात आली. तसेच एनडीआरएफ व सिव्हिल डिफेन्सच्या मदतीने विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये एक हजाराहून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. २०२५ मध्ये ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तत्परता, समन्वय व कार्यक्षमतेच्या जोरावर आपत्तींचे प्रभावी व्यवस्थापन करत नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले आहे.

तक्रारींमध्ये यांचा समावेश
ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तीन हजार २६४ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये आगीच्या ६७१, झाडे पडण्याच्या ५०२, झाडांच्या फांद्या पडण्याच्या ३४९, प्राणी-पक्षी अडकण्याच्या ३३६, रस्त्यावर ऑईल सांडणे १४९, पाणी साचण्याच्या १०३ तक्रारींसह इतर विविध घटनांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com