अर्ज छाननित आई अपात्र तर मुलगी पात्र

अर्ज छाननित आई अपात्र तर मुलगी पात्र

Published on

अर्ज छाननीत आई अपात्र, मुलगी पात्र
वसई-विरारमध्ये बविआच्या मनीष राऊत यांचा अर्ज बाद
नालासोपारा, ता. ३१ : वसई-विरार महापालिका निवडणुकीची बुधवारी (ता. ३१) अर्ज छाननी झाली. यात बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका मीनल पाटील आणि मनीष राऊत या दोघांचे अर्ज बाद झाले. तर त्यांचे डमी असणारे उमेदवार ऋषिका रमाकांत पाटील आणि स्वप्नील ऊर्फ बाळा पाटील हे दोघे जण पात्र ठरले आहेत. यात आई मीनल पाटील यांची मुलगीच ऋषिका असल्यामुळे आई आणि मुलींमध्ये खुशी आणि गमची भावना पाहायला मिळाली. तर मनीष राऊत हे निवडणुकीतून बाद झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

विरार पूर्व वॉर्ड क्रमांक ६ मधून माजी नगरसेविका मीनल पाटील, संगीता भेरे, विनोद पाटील आणि मनीष राऊत यांना बहुजन विकास आघाडीने उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या सर्व उमेदवारांना पक्षाने एबी फॉर्म जोडून अधिकृत उमेदवारी दिली होती. मीनल पाटील यांनी त्यांची मुलगी ऋषिका हिला तर मनीष राऊत यांनी स्वप्नील पाटील यांना डमी उमेदवार म्हणून ठेवले होते.
सूचक सारखेच ठेवले
मनीष राऊत यांनी वॉर्ड क्रमांक ६ मध्ये क आणि ड मधून दोन अर्ज भरले होते. क मध्ये पहिला अर्ज भरला आणि तीन मिनिटांच्या फरकाने ड मधून दुसरा अर्ज भरला होता. पण दोन्ही अर्जांना अनुमोदक, सूचक सारखेच ठेवले होते. पक्षाने क मध्ये विनोद पाटील यांना अधिकृत केले होते, तर ड मध्ये मनीष राऊत यांना अधिकृत केले होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांचा पहिला अर्ज पात्र ठरला, पण दुसरा अर्ज बाद ठरला. जर ड मध्ये दुसरे अनुमोदक, सूचक दिले असते तर दोन्ही अर्ज पात्र ठरले असते. अवघ्या तीन मिनिटांमुळे मनीष राऊत यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला असून, डमी उमेदवार स्वप्नील पाटील यांना या निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळाली आहे. ऋषिका पाटील ही २५ वर्षांची तरुणी असून, एमबीए आहे. तर स्वप्नील पाटील हे पक्षात २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. या निवडणुकीत या दोन्ही नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com