नाताळ गोठ्यातून अध्यात्मिक दर्शन
नाताळ गोठ्यातून उलगडली ‘येशूंची जीवनगाथा’
गास गावातील ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम
वसई, ता. १ (बातमीदार) : नाताळ सणानिमित्त वसई-विरारमधील घराघरात आणि चर्चमध्ये भक्तीचे वातावरण असताना, नालासोपारा पश्चिमेकडील गास (लहान सरगोडी) गावातील ग्रामस्थांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या भव्य गोठ्यातून बाळ येशूचा जन्म, त्यांचा जीवनप्रवास, मानवतेचा संदेश आणि पुनरुत्थान अशी संपूर्ण ‘आध्यात्मिक गाथा’ साकारण्यात आली आहे.
गोठ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून केलेली निर्मिती. पूर्वी गाणी किंवा चित्रपट पाहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या, मात्र आता अडगळीत पडलेल्या शेकडो सीडी जमा करून त्यापासून गोठ्यासमोर एक भव्य चांदणी (स्टार) तयार करण्यात आली आहे. ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेचा हा सुंदर नमुना पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. केवळ येशूचा जन्मच नव्हे, तर त्यांनी समाजाला दिलेला न्याय, समता आणि गरिबांवरील प्रेमाचा संदेश या कलाकृतीतून मांडण्यात आला आहे. गोठा उभारताना माती, लाकूड आणि घरगुती साहित्याचा वापर करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील लहान मुलांनी आणि तरुणांनी एकत्र येऊन अनेक दिवसांच्या मेहनतीतून ही रोषणाई आणि देखावा पूर्ण केला आहे.
बाळ येशूचा जन्म ते मृत्यू आणि पुनरुत्थान असा त्यांचा संपूर्ण प्रवास गोठ्यातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गतवर्षी आम्ही सामाजिक विषयावर देखावा केला होता, तर यंदा येशूची गाथा मांडल्याची माहिती गास गावचे एव्हरेस्ट परेरा यांनी दिली.
सीडीचा वापर करून चांदणी उभारली
पूर्वी गाणी, सिनेमा पाहण्यासाठी सीडीचा वापर होत असे, परंतु कालांतराने बदल झाले. अनेकांच्या घरात अद्याप अडगळीत सीडी आहेत. त्या जमा करून त्यापासून या नाताळ गोठ्यासमोर चांदणी (स्टार) उभारण्यात आली आहे. टाकाऊपासून टिकाऊ अशी संकल्पना दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

