अहमदाबाद येथे वारली कलेचे प्रदर्शन
वारली कलेचे अहमदाबादमध्ये प्रदर्शन
तलासरी, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील वेवजी सिगलपाडा येथील दोन आदिवासी युवा कलाकारांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर पारंपरिक वारली चित्रकला राज्याच्या सीमा ओलांडून गुजरातमध्ये पोहोचवली आहे. अहमदाबाद येथील भागवत युनिव्हर्सिटीत आयोजित २३व्या ‘सात्त्विक फेस्टिव्हल''मध्ये साहील घाटाळ आणि राकेश दळवी या तरुणांनी साकारलेल्या वारली पेंटिंगला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डिजिटल युगात वारली कलेसाठी लागणारा संयम आणि मेहनत घेणारे कलाकार दुर्मिळ होत असताना, साहील आणि राकेश यांनी ही संस्कृती जपण्याचा निर्धार केला आहे. २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या या उत्सवात त्यांच्या चित्रांचे केवळ प्रदर्शनच भरवण्यात आले नव्हते, तर मोठ्या प्रमाणावर विक्रीही झाली. अहमदाबादमधील नागरिकांनी या आदिवासी कलेचे तोंडभरून कौतुक केले. हे दोन्ही कलाकार सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या या तरुणांनी स्वावलंबनाचा आदर्श मार्ग निवडला आहे.
पारंपरिक वारसा
पाड्यांवरील लग्नसमारंभांत आजही ते पारंपरिक ‘लग्न चौक’ रेखाटण्याचे काम करतात. गेल्या चार वर्षांपासून विविध ठिकाणी स्टॉल्स लावून ते आपल्या कलेचे मार्केटिंग करीत आहेत. त्यांच्या कलेची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना ‘आर्टिसन कार्ड’ बहाल केले आहे.
कलेला मिळाली नवसंजीवनी
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा व शिका या योजनेचा अवलंब करीत या तरुणांनी आदिवासी पाड्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेले आहे. या यशामुळे स्थानिक वारली कलाकारांना आता मोठ्या बाजारपेठा आणि राष्ट्रीय व्यासपीठे मिळतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

