रायगड जिल्ह्यात नववर्षाचे उत्साहात स्वागत

रायगड जिल्ह्यात नववर्षाचे उत्साहात स्वागत

Published on

रायगड जिल्ह्यात नववर्षाचे उत्साहात स्वागत
समुद्रकिनारी फटाक्यांची आतषबाजी
अलिबाग, ता. १ (वार्ताहर) ः थर्टी-फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने अलिबाग समुद्रकिनारी गर्दी केली होती. पर्यटकांनी अलिबाग शहरातील रस्ते गजबजून गेले होते. हॉटेल, रेस्टारंट, लॉजिंग पर्यटकांनी फुलून गेले होते. समुद्रकिनारी पर्यटकांसह स्‍थानिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, किहीम, काशीद, मुरूड, श्रीवर्धनचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. घोडेसवारी, घोडागाडी, उंटाची सफर, स्पीड बोटीचा थरार, बोटीतून किल्ला दर्शन, एटीव्हीची राइड अशा मनोरंजनांच्या साधनांचा आनंद पर्यटकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला लुटला. समुद्रकिनारी भेळपुरी, पाणीपुरी, पावभाजी, वडापाव, मसाला डोसा, सॅण्डविच, फ्रँकरोल अशा विविध स्टॉल्सवर खवय्यांनी गर्दी केली. सेलिब्रेशनसाठी विशेष पार्टीचेदेखील काही ठिकाणी आयोजन केले होते. रात्री उशिरा अलिबागच्या समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटक मोठ्या संख्येने जमले होते. १२ वाजून एक मिनिटांनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे सर्वांनी जल्लोषात स्वागत केले. त्या वेळी फटाक्यांच्या आतषबाजीने समुद्रकिनारा उजळून निघाला. नववर्ष स्वागतासाठी हजारो पर्यटक अलिबागसह नागाव, किहीम, काशिद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर दाखल झाले होते. २०२५च्या शेवटच्या मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी सायंकाळी पर्यटकांनी गर्दी केली होती. रात्री ठिकठिकाणी पर्यटकांच्या पार्ट्या सुरू होत्या. अनेक पर्यटकांनी पॅराशूट आकाशात सोडून सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत केले. किनारपट्टीबरोबरच कर्जत, खालापूर तालुक्यातील अनेक फार्महाउस हाउसफुल्ल झाली होती. माथेरानमध्येही पर्यटकांचा उत्साह टिपेला पोहोचला होता. तेथेही मुंबई, पुणेकर मोठ्या संख्येने आपल्या कुटुंब, मित्रमैत्रिणींसह दाखल झाले होते.
नववर्ष स्वागताचा हा माहोल दिवसभरदेखील सुरू होता.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com