पनवेलमध्ये ३४३ अर्ज वैध
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत १११ जागांसाठी अखेर ८३९, तर पनवेल महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३४३ अर्ज वैध ठरले आहेत. उद्या (ता. २) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या काळानंतर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार, हे अंतिम ठरणार आहे.
पनवेल महापालिकेत भाजपचे उमेदवार नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज बिनविरोध जिंकल्यामुळे भाजपची चांगली सुरुवात झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ आता वाशीमध्येही भाजपला फटका बसला आहे. भाजपचे उमेदवार नीलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने गणेश नाईक गटाला फटका बसला आहे.
नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप गटाकडे मोठ्या प्रमाणात बंडखोर अपक्षांची संख्या आहेत. त्यापैकी भाजपच्या १३ बंडखोर अपक्षांचे अर्ज बाद ठरले आहेत; मात्र काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अजूनही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांची मनधरणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. भाजपला ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा शिंदे गटासोबत काट्याची टक्कर होणार आहे. बेलापूर मतदारसंघात भाजपकडे अधिक माजी नगरसेवकांची ताकद असल्याने शिंदे सेनेपेक्षा ते वरचढ ठरण्याची शक्यता आहे. त्याउलट शिवसेनेकडून वेगात प्रचार सुरू केला आहे.
प्रभाग अर्ज वैध अवैध
बेलापूर १३६ १२७ ९
नेरूळ १६२ १३४ २८
वाशी १०२ १०१ १
तुर्भे १४५ १३१ १४
कोपरखैरणे १२३ १०५ १८
घणसोली ११३ ७४ ३९
ऐरोली ८९ ८३ ६
दिघा ८६ ८४ २
एकूण ९५६ ८३९ ११७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

