मुंबई पालिका निवडणुकीच्या रिंगणात १, ७२९ उमेदवार
मुंबईच्या रिंगणात १,७२९ उमेदवार
शेवटच्या दिवशी ४५३ अर्ज मागे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई पालिकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४५३ जणांनी माघार घेतली. यामध्ये बंडखोर, अपक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता २२७ वॉर्डांतून एक हजार ७२९ उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अनेक बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांची अंतिम यादी शनिवारी (ता. ३) प्रकाशित होणार आहे. ही यादी आल्यानंतर कुठल्या बंडखोरांनी आपली तलवार म्यान केली, हे स्पष्ट होणार आहे.
मुंबईत २२७ वॉर्डांसाठी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दाेन हजार ५१६ अर्ज दाखल झाले होते. यातील १६४ अर्ज छाननीत अवैध ठरले. उर्वरित दाेन हजार १८५ अर्ज वैध ठरले होते. शनिवारी (ता. ३) सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. चिन्हाचे वाटप पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वंचितने काँग्रेसच्या तीन वॉर्डांत आपले उमेदवार उभे केले आहेत. रिपाइंच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले.
सर्वाधिक उमेदवार रिंगणात असलेले विभाग
१. एम पूर्व - १२१
२. जी उत्तर - १०९
३. के पश्चिम - १०४
४. एम पूर्व + एम पश्चिम - ९७
५.एफ उत्तर - ९३
६. ए + बी + ई - ९२
....
सर्वाधिक कमी उमेदवार असलेले विभाग
१. आर मध्य - ३५
२. आर उत्तर - ३९
३. सी + डी - ४४
४. एफ दक्षिण - ५०
५. जी दक्षिण - ५१
प्रमुख बंडखोर
भाजप
- वॉर्ड क्रमांक ६० - दिव्या ढोले
- वॉर्ड क्रमांक १७३ - शिल्पा केळुसकर
- वॉर्ड क्रमांक १७७ - नेहल शाह
- वॉर्ड क्रमांक १८० - जान्हवी पाठक
- वॉर्ड क्रमांक २०५ - जान्हवी राणे
- वॉर्ड क्रमांक १०९ - गणेश जाधव
- वॉर्ड क्रमांक ११९ - श्रुती घोगळे
शिवसेना (उबाठा)
वॉर्ड क्रमांक १९३ - सूर्यकांत कोळी
वॉर्ड क्रमांक १९६ - संगीता जगताप
वॉर्ड क्रमांक १९७ - श्रावणी देसाई
वॉर्ड क्रमांक २०२- विजय इंदूलकर
वॉर्ड क्रमांक २०५- दिव्या बडवे
वॉर्ड क्रमांक १०६ - सागर देवरे
वॉर्ड क्रमांक १५९ - कमलाकर नाईक
वॉर्ड क्रमांक ९५ - चंद्रशेखर वायंगणकर
मनसे
११४ वॉर्ड - अनिशा माजगावकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

