अतिजलद प्रवासाकडे पाऊल
अतिजलद प्रवासाकडे पाऊल
पालघरमधील बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण
पालघर, ता.३ ः मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पातील बुलेट ट्रेन मार्गातील विरार, बोईसर स्थानकादरम्यानचा दीड किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अतिजलदप्रवासातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी पाचशे आठ किलोमीटर आहे. यामध्ये २७.४ किलोमीटर लांबीचे बोगदे असून २१ किलोमीटर भूमिगत बोगदे आणि ६.४ किलोमीटर भूपृष्ठ बोगदे आहेत. आठ डोंगरांमधून बोगदे जात असून महाराष्ट्रातील साडेसहा किलोमीटरचे एकूण सात बोगदे आहेत. गुजरातमध्ये साडेतीनशे मीटरचा एक बोगदा आहे. अशातच अतिउच्च तंत्रज्ञानाने दोन्ही बाजूने उत्खनन करून ड्रिल, ब्लास्टिंग पद्धतीचा वापर करत पालघर जिल्ह्यातील विरार, बोईसर स्थानकादरम्यानचा बोगदा १८ महिन्यांत हापूर्ण करण्यात आला आहे. जागेच्या परिस्थितीनुसार शॉर्टक्रीट, रॉक बोल्ट आणि लॅटिस गर्डर सारख्या आधार प्रणालीची उभारणी बोगद्यामध्ये आहे.
------------------------------------------
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्र - ६.०५ लांबीचे सात बोगदे
गुजरात - ३५० मीटरचा एक बोगदा
भूमिगत बोगदे - २१ किमी
भूपृष्ठवरील बोगदे - ६.४ किमी
--------------------------
एकूण लांबी - ५०८ किमी
गुजरात व दादरा नगर हवेली लांबी - ३५२ किमी
महाराष्ट्रातील लांबी - १५६ किमी
------------------------
‘या’ शहरांना जोडणार
साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिल्लीमोरा, वापी, बोईसर विरार ठाणे आणि मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

