गरवी तुर जोरात....
तुरीमुळे बळीराजाला धनलाभ
जिल्ह्यात चार हजार ६४० हेक्टरवर लागवड
वाणगाव, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात भातशेती खरिपातील महत्त्वाचे पीक असले तरी गरव्या जातीच्या तुरीचीदेखील लागवड केली जाते. ही तुरी साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारीत परिपक्व होऊन झोडणी केली जात असल्याने खरीप हंगामात शेतकऱ्याला दुहेरी आर्थिक लाभ होणार आहे.
बदलते हवामान, पावसाची अनियमिततेमुळे खरीप हंगामातील भातपिकात शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अतिरिक्त उत्पादन, उत्पन्न मिळावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामात बांधावर तूर लागवड केली जाते; पण काही वर्षांपासून भातकापणीदरम्यान परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान होत आहे; मात्र बांधावर तूर लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी भात बियाण्यांबरोबर तूर बियाण्याचे वाटप कृषी विभागामार्फत झाले आहे. परिणामी, तूर लागवड क्षेत्र वाढल्याने आदिवासी भागातील कुपोषणमुक्तीसाठी फायदा होईल, असे मत व्यक्त केले आहे. तसेच शेतकरी वर्षभर खाण्यापुरती डाळ घरी ठेवून उर्वरित विक्री करून चार पैसे मिळवू शकणार आहे.
-------------------------------
वर्षभराची बेगमी
- थंडीच्या दिवसांमध्ये पोपटी करण्याची प्रथा टिकून आहे. पोपटीमध्ये तुरीच्या शेंगा टाकून स्वाद घेण्याचा आनंद लुटत आहेत. उकडून खाण्यासाठी ग्राहकांकडून मागणी वाढतच आहे. भाजी करण्यासाठी हिरव्या कोवळ्या तुरीच्या शेंगांना पसंती मिळत आहे.
- एक एकरावर सुमारे ६० तुरीची रोपे लावली तरी प्रति रोप २०० ग्रॅम तुरीचे उत्पादन आले तरी सुमारे १२ किलो तूरडाळ घरच्या वापरासाठी मिळू शकते. प्रतिमहिना एक किलोप्रमाणे शेतकऱ्याचा वर्षाच्या तूरडाळीचा बंदोबस्त होऊ शकतो.
-----------------------------
सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र
तालुका बियाणे वाटप (किलोमध्ये)
मोखाडा ५००
वाडा ४४६
डहाणू ४२६
पालघर ४०६
---------------------------------
खरिपात बांधावर तूर लागवड केली आहे. सध्या तूर दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. तूरडाळीचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने घरच्या उदरनिर्वाहासाठी तूर लागवड फायदेशीर ठरत आहे.
- अनिल पाटील, तूर उत्पादक, कोलवली (वाणगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

