चांदिवलीतील सिटीझन्सचा जाहीरनामा जाहीर

चांदिवलीतील सिटीझन्सचा जाहीरनामा जाहीर

Published on

चांदिवलीतील सिटिझन्सचा जाहीरनामा प्रसिद्ध
पारदर्शक, स्वच्छ आणि लोकाभिमुख प्रशासनाची मागणी
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने चांदिवली विभागासाठी सविस्तर, लोकाभिमुख आणि नागरिककेंद्रित जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात नागरी सुविधा, पारदर्शक कारभार, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार प्रशासन यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनचा हा जाहीरनामा म्हणजे स्वच्छ प्रशासन, पारदर्शकता आणि नागरिककेंद्रित विकासाचा स्पष्ट आराखडा असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी या मुद्द्यांवर उमेदवारांची कसून चाचणी घ्यावी, असे आवाहन असोसिएशनचे संस्थापक मनदीप सिंह मक्कर यांनी केले आहे.

प्रमुख मुद्दे व ठळक मागण्या
अवैध होर्डिंग, बॅनरबाजी व भिंती रंगवून परिसर विद्रूप करणाऱ्या प्रकारांना पूर्णत: आळा
सार्वजनिक निधीतून उभारलेल्या कामांवर राजकीय फोटो व नावे लावण्यास बंदी
पैसा जनतेचा, श्रेय कुणाचे, हा प्रश्न उपस्थित
कूकर, साड्या, मिक्सर अशा वस्तू वाटपासाठी महापालिकेचा निधी वापरणे थांबवावे
बीएमसीला राज्याच्या ऑनलाइन आरटीआय प्रणालीत समाविष्ट करून माहिती मिळवणे सुलभ करावे
महापालिकेचा खर्च शिस्तबद्ध करून नागरिकांवरील कराचा बोजा कमी करावा
निधी केवळ नागरिकहिताच्या व आवश्यक विकासकामांसाठीच वापरावा
महापालिका सभागृहात चांदिवलीतील प्रश्न ठामपणे व सातत्याने मांडावेत
‘सार्वजनिक वाचनालय’ किंवा अन्य नावाखाली होणारे राजकीय अतिक्रमण थांबवावे
फुटपाथ मोकळे ठेवून गॅस सिलिंडर व अतिक्रमणे हटवावीत
डीपीप्रमाणे रस्ते रुंदीकरण करून अंधेरी–चांदिवली जेव्हीएलआर जोडणारा ९० फूट रस्ता तातडीने पूर्ण करावा
बेकायदा भट्ट्या व आरएमसी प्लांट्सवर कठोर कारवाई
उद्यान, दवाखाने व शाळांची नियमित देखभाल
रस्त्यांवरील कचऱ्याचे ढिगारे हटवण्यासाठी ठोस धोरण
वर्षभर टिकणारे दर्जेदार रस्ते निर्माण करावेत
निवडून आल्यानंतर पक्षांतर न करता जनतेशी प्रामाणिक राहावे
चांदिवली-पवई परिसरात आधुनिक क्रीडा संकुल उभारावे
निविदा मंजूर झाल्यानंतर कामे रखडू नयेत
हाताने मैला साफ करण्याची प्रथा पूर्णपणे बंद करावी
उद्यानांचे सौंदर्यीकरण व देखभाल वाढवावी
चांदिवलीत सुसज्ज अग्निशमन केंद्र तातडीने कार्यान्वित करावे
पावसाळ्यातील जलभराव रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना
वारंवार खोदकाम टाळण्यासाठी भूमिगत सेवा मार्गिका उभाराव्यात
दर तीन महिन्यांनी नागरिक मंचांसोबत आढावा बैठक घ्यावी
प्रभागनिहाय कामे, खर्च, कंत्राटदार व प्रगतीची माहिती ऑनलाइन उपलब्ध करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com