रायगड पोलिसांकडून ८५ टक्के गुन्हे उघडकीस
रायगड पोलिसांकडून ८५ टक्के गुन्हे उघडकीस
चोरी, घरफोडी, दरोड्याच्या घटनांमध्ये जलद गतीने तपास
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) : रायगड पोलिसांनी गेल्या वर्षभरात दमदार कामगिरी करीत २०२५ या वर्षात चोरी, घरफोडी, दरोड्याचे सुमारे ८५ टक्के गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी जोमाने काम करीत असून जिल्हाभरात रायगड पोलिसांचे कौतुक होत आहे.
रायगड पोलिसांकडून गेल्या काही वर्षांपासून विविध गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच काही अपवादात्मक घटना वगळता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात यशस्वी झाले आहेत. मे २०२५मध्ये आंचल दलाल यांनी रायगड जिल्ह्याच्या अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर काही महिन्यांतच चोरी, अवैध धंदे, अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना जरब बसली आहे. २०२५ या वर्षात दरोड्याचे तीन गुन्हे दाखल होते. हे तिन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत. जबरी चोरीचे २८ गुन्हे दाखल होते. त्यातील २४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीचे १४३ गुन्हे दाखल होते. त्यातील ९५ गुन्ह्यांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. तर चोरीचे २७१ गुन्हे दाखल होते. त्यातील १७३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२४च्या तुलनेत २०२५ या वर्षात गुन्हे उघडकीस आणण्यात आणि आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे प्रमाण हे सुमारे दोन ते तीन टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे रायगड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
...............
चौकट
गुन्ह्याचे प्रकार दाखल गुन्हे उघडकीस आलेले गुन्हे
१. दरोडा ३ ३
२. जबरी चोरी २८ २४
३. घरफोडी १४३ ९५
४. चोरी २७१ १७३
.............
प्रतिक्रिया :
प्रत्येक गुन्हा उघडकीस आणून आरोपीला जेरबंद करण्याचा आमचा कायमच प्रयत्न असतो आणि यापुढेही राहील. चोरी, घरफोडीसारख्या घटना उघडकीस आणण्यात आम्हाला यावर्षी चांगले यश प्राप्त झाले आहे. यापुढेही चांगली कामगिरी करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
- आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

