तुर्भे विभागात निवडणुकीची चुरस टोकाला

तुर्भे विभागात निवडणुकीची चुरस टोकाला

Published on

तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : तुर्भे विभागातील निवडणूक आता अत्यंत चुरशीची बनली असून प्रत्येक गल्ली-बोळात राजकीय हालचालींना उधाण आले आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही जोरदार ताकदीनिशी मैदानात उतरले असल्याने लढत रंगतदार झाली आहे. शहरातील आठ विभागांतून एकूण २६९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता ४९९ उमेदवार महापालिकेच्या आखाड्यात आपले नशीब आजमावणार आहेत. तुर्भे विभागात सर्वाधिक चुरस निर्माण झाली असून या विभागात सर्वाधिक ८४ उमेदवार रिंगणात असल्याने येथे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

नवी मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुर्भे एआयडीसीमध्ये एकूण पाच प्रभाग असल्याने यावर्षी ही निवडणूक चूरशीची होणारा आहे. उमेदवारांकडून घरोघरी भेटी, सभा, पदयात्रा, कोपरा सभा यांचा धडाका सुरू असून समाज माध्यमांवरही प्रचाराला वेग आला आहे. विकासकामांचे आश्वासन, स्थानिक प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे, पाणी-वाहतूक-घरबांधणी हे विषय प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. एकाच मतदारसंघात अनुभवी चेहरे आणि नवख्या उमेदवारांची थेट टक्कर पाहायला मिळत आहे. घराणेशाही, पक्षबदल आणि अंतर्गत नाराजी यामुळे काही पक्षांसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण आहे.

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा आवाज वाढत असून वातावरण तापले आहे. अखेरचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार असले तरी तुर्भे विभागातील ही निवडणूक नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com