बंड शमले अपक्षांची डोकेदुखी कायम
अपक्षांची ‘डोकेदुखी’ कायम
८६ उमेदवार मैदानात
ठाणे, ता. ३ : ठाणे महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना यश आले असले, तरी ८६ अपक्ष उमेदवारांनी राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ३३ प्रभागांतील चुरस आता या अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. १३१ जागांसाठी झालेल्या वाटपात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. चार-पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेली निवडणूक आणि इच्छुकांची प्रचंड गर्दी यामुळे बंडखोरी उफाळून आली होती. नेत्यांनी डॅमेज कंट्रोल करीत ९० टक्के बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यात यश मिळवले असले, तरी काही ठिकाणी बंडखोर अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम आहेत.
२०१७मध्ये ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यानंतर २०२२ मध्ये ठाणे पालिकेची मुदत संपुष्टात आली. त्यातच कोरोना या महामारीमुळे निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्या होता. त्यामुळे तब्बल चार ते पाच वर्षांनंतर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने शिंदे सेना, भाजप, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, मनसे, शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षांतून निवडणुका निवडणुका लढविण्यास इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. त्यात शिंदे सेनेसह भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती. मात्र महायुतीत जागा वाटपात कमी-अधिक जागा आल्यामुळे पक्षश्रेष्ठींना जागावाटपात सर्वांना न्याय देता आला नाही; मात्र निष्ठावंत आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झिजणाऱ्या इच्छुकांना डावलण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे महायुती व आघाडीतील नेत्यांपुढे या बंडोबांचे बंड थोपविण्यासाठी कंबर कसली असून, बंड शमविण्यात ९० टक्के यश आले असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. असे असले तरी दुसरीकडे अपक्ष उमेदवारांची डोके दुखी कायम असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हौशे पोटी, तर, कोणी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कामावर नाराजी व्यक्त करीत, त्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकत आवाहन देण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे पालिकेच्या ३३ प्रभागातील १३१ जागांसाठी १४१ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापैकी ५५ अपक्षांनी अर्ज माघारीत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतेले असून प्रत्यक्ष ८६ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रीनागणात उभे ठाकले आहे. त्यामुळे पक्षातील बंडखोरांचे बंड शमविण्यात राजकीय पक्षांना काहीअंशी यश आले असले तरी अपक्षांसह बंडखोरीचे आवाहन मात्र कायम असणार आहे.
उमेदवारांनी घेतली माघार
ठाणे पालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच निवडणूक होण्याआधीच अर्ज माघारीच्या दिवशी अपक्षांसह काही स्थानिक पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ठाणे पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. माघार घेतलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, लोकराज्य पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, जनता दल (सेक्युलर) आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

