विजयाच्या आनंदावर विरजण

विजयाच्या आनंदावर विरजण

Published on

विजयाच्या आनंदावर विरजण
वेवजी येथील शालेय स्पर्धेत विद्यार्थिनीचा मृत्यू
तलासरी, ता. ४ (बातमीदार) ः तलासरी तालुक्यातील वेवजी येथील शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शालेय क्रीडा स्पर्धांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वेवजी सोरठपाडा येथे शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाअंतर्गत शनिवारी (ता. ३) मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत दहावीमध्ये शिक्षण घेणारी उंबरगाव येथील रहिवासी असलेली रोशनी गोस्वामीने जिद्दीने धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला; मात्र शर्यत पूर्ण झाल्यानंतर तिच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. रोशनीला धाप लागल्याने श्वास घेण्यास त्रास झाल्याने मैदानावरच बेशुद्ध पडली. शिक्षकांनी तातडीने तिला उंबरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे शालेय स्पर्धांच्या आयोजनाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
------------------------------
आयोजनातील त्रुटी
- जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचा हंगाम सुरू आहे; मात्र स्पर्धांच्या नियोजनात विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. कोणत्याही पूर्व सरावाशिवाय विद्यार्थ्यांना मॅरेथॉनसारख्या कठीण स्पर्धांमध्ये उतरवले जाते.
- स्पर्धेपूर्वी वैद्यकीय तपासणी किंवा तंदुरुस्ती मूल्यांकन होत नाही. कडक उन्हात आयोजन, पाण्याच्या सुविधेच्या सोय, अनेक विद्यार्थी उपाशीपोटी स्पर्धेत सहभागी मैदानावर डॉक्टर, रुग्णवाहिका किंवा सक्षम प्रथमोपचार व्यवस्था नसते.
--------------------------------
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
रोशनी होतकरू, स्वप्न पाहणारी विद्यार्थिनी असल्याने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे. तर माझी मुलगी ठणठणीत होती. सकाळी घरची कामे करून, नाश्ता करून ती मॅरेथॉनला निघाली. जाताना तिने माझ्या पाया पडून आशीर्वाद मागितले. दुपारी शाळेकडून तिच्या मृत्यूची बातमी आली, सगळे जगच कोसळल्याची भावना तिची आई सुनीताबेन गोस्वामी यांनी व्यक्त केली.
----------------------------------
मुलीला त्रास झाल्यानंतर महिला शिक्षकांनी उपचार देण्याचा प्रयत्न केला. तिला कारमधून उंबरगाव येथील डॉ. लोखंडे, नंतर दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले; पण उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
- राकेश शर्मा, प्राचार्य, भारती अकादमी स्कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com