लेकीला उमेदवारी मिळताच उबाठा विभागप्रमुखाचा शिवसेनेत प्रवेश

लेकीला उमेदवारी मिळताच उबाठा विभागप्रमुखाचा शिवसेनेत प्रवेश

Published on

कन्येला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर
ठाकरे गटाचे दीपक साळवे शिंदे गटात दाखल
उल्हासनगर, ता. ४ (बातमीदार) : ठाकरे गटाचे विभागप्रमुख दीपक साळवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, साळवे यांच्या कन्येला शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या वेळी चोपडा कोर्टाजवळील ठाकरे गटाची शाखाही ताब्यात घेण्यात आली.
दीपक साळवे हे गेल्या ४० वर्षांपासून ठाकरे गटात कार्यरत होते. त्यांची कन्या गौतमी साळवे हिचा विवाह आरपीआय (आठवले गट)चे शहराध्यक्ष नाना बागूल यांचे पुत्र आणि पोलिस उपनिरीक्षक राहुल बागूल यांच्याशी झाला आहे. गौतमी उच्चशिक्षित असल्याने नाना बागूल यांनी सुनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. गौतमी यांना शिंदे गटाने उमेदवारी दिल्यानंतर दीपक साळवे यांनी ठाकरे गटापासून फारकत घेत पक्षांतर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या प्रवेशप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे शहराध्यक्ष नाना बागूल, माजी नगरसेवक अंकुश म्हस्के, कलवंतसिंग सोहता आदी मान्यवर उपस्थित होते. या घटनेमुळे उल्हासनगरच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com