कळव्यात पोलिसांचे "कोम्बिंग ऑपरेशन"

कळव्यात पोलिसांचे "कोम्बिंग ऑपरेशन"

Published on

कळव्यात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
कळवा, ता. ४ (बातमीदार) : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कळवा, मुंब्रा आणि शिळ-डायघर पोलिसांनी संयुक्तपणे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. शनिवारी (ता. ३) मध्यरात्री ११.३० ते पहाटे १.३० वाजेपर्यंत राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया डमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कळवा विभागातील संवेदनशील आणि वर्दळीच्या ठिकाणांना लक्ष्य केले. शांतीनगर (कळवा पूर्व) व मफतलाल कंपाउंड, पौंड पाडा, घोलाईनगर आणि भास्करनगर, कळवा रेल्वे स्थानक परिसर यामध्ये प्रामुख्याने या भागांचा समावेश होता.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये विशेषतः पोलिस दप्तरी नोंद असलेल्या आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुंडांची झाडाझडती घेण्यात आली. न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करणारे, फरार असलेले आणि लपून बसलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. महिला व मुलांशी संबंधित गुन्हेगारांना ताकीद देण्यात आली.

संयुक्त पथकांचा सहभाग
कळवा, मुंब्रा आणि शिळ-डायघर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रतिबंधक पथके आणि समन्स बजावणारी पथके या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी निर्जन स्थळी आणि संशयित ठिकाणी धाडसत्र राबवून गुन्हेगारांना समज देण्यात आली आहे, अशी माहिती कळवा पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com