एकाकी वृद्ध महिलेला मदतीचा हात

एकाकी वृद्ध महिलेला मदतीचा हात

Published on

एकाकी वृद्ध महिलेला मदतीचा हात
समाजसेवक व पोलिसांच्या पुढाकारातून वृद्धाश्रमात सुरक्षित निवारा
रोहा, ता. ४ (बातमीदार) : रोहा शहरातील गणेशनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या ७५ वर्षीय एकाकी वृद्ध महिलेच्या पुनर्वसनासाठी समाजसेवक व रोहा पोलिसांनी पुढाकार घेत मानवतेचा आदर्श निर्माण केला आहे. पतीच्या निधनानंतर कोणतीही देखभाल करणारी व्यक्ती नसल्याने असहाय अवस्थेत जीवन जगणाऱ्या अनुसया चौधरी यांना सुरक्षितपणे वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्यांना वृद्ध महिलेच्या परिस्थितीची माहिती मिळताच तिची पाहणी करण्यात आली. वयोमानानुसार आजारपण व दैनंदिन गरजांसाठी मदतीची आवश्यकता असल्याने एकट्याने राहणे धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर समाजसेवक बिलाल मोरबेकर यांनी संबंधित महिलेची विचारपूस करून तिच्या सहमतीने आवश्यक वैद्यकीय तपासणी, पोलिसांचे पत्र व लेखी जबाबाची पूर्तता केली.
समाजसेवक बिलाल मोरबेकर, राजश्री पाटील, सविता सोनार, दिनेश शिर्के, स्थानिक नागरिक व रोहा पोलिसांच्या समन्वयातून त्या वृद्ध महिलेला पुणे येथील ‘ओम श्री विश्वदर्शन सेवा संस्था’ संचालित विसावा माया केअर सेंटर वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले. या कार्यवाहीमुळे एकाकी वृद्ध महिलेला सुरक्षित निवारा व आधार मिळाला आहे.

चौकट :
मानवतेचा आदर्श
एकाकी वृद्धांच्या प्रश्नांकडे समाज व प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज या घटनेतून स्पष्ट झाली आहे. समाजसेवक बिलाल मोरबेकर, त्यांच्या सहकाऱ्यांसह रोहा पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com