ठाण्यात बिबट्यांची दहशत

ठाण्यात बिबट्यांची दहशत

Published on

ठाण्यात बिबट्यांची दहशत
येऊर, वारली पाड्यात दोन श्वानांवर हल्ला

ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये बिबट्यांचे दर्शन वारंवार घडू लागले आहे. शुक्रवारी (ता. २) रात्री दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्यांनी दोन कुत्र्यांची शिकार केल्याने येऊर आणि वागळे इस्टेट परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी रात्री बिबट्याने येथील वस्तीत शिरून एका पाळीव श्वानाला उचलून नेले. या आठवड्यातील बिबट्या दिसण्याची ही दुसरी घटना आहे. याच रात्री येऊरच्या प्रवेशद्वाराजवळही एका बिबट्याचे दर्शन झाले. त्यानेही एका श्वानाला आपले भक्ष्य बनवले. या दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातील गृहनिर्माण सोसायट्या आणि पाड्यांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

वनविभागाच्या मते, राष्ट्रीय उद्यानात ६० हून अधिक बिबटे आहेत. जंगलात नैसर्गिक शिकार शोधण्यापेक्षा मानवी वसाहतींमधील श्वान, मांजर, कोंबड्या आणि बकऱ्या यांसारखे सहज उपलब्ध होणारे खाद्य बिबट्यांना आकर्षित करत आहे. यामुळेच संरक्षण भिंती असूनही बिबट्या रात्रीच्या वेळी पाड्यांमध्ये शिरकाव करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॉसमॉस सोसायटी परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोनचा वापर केला होता. आता ताज्या घटनांनंतर वनविभागाने खालील पावले उचलली आहेत.

गस्त वाढवली
येऊर परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी अधिक गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर एकट्याने पडू नये आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बिबट्यांचा हा नेहमीचा वावरण्याचा मार्ग आहे. जरी मानवावर हल्ल्याचे प्रकार घडले नसले, तरी खबरदारी म्हणून पाड्यांच्या परिसरात कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली आहे.
- मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com