अपक्षांचे फुटले पेव

अपक्षांचे फुटले पेव
Published on

अपक्षांचे फुटले पेव
पालिका निवडणुकीसाठी तब्बल ५५१ उमेदवार
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : निवडणूक म्हटले की सर्वसामान्य नागरिक दोन हात लांब राहणे पसंत करतात. कागदपत्रांची जुळवाजुळव, कार्यकर्त्यांना सांभाळायचे कसे, असे म्हणत राजकारणापासून दोन हात लांब राहत असले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील चित्र वेगळे आहे.
२२७ प्रभागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात वेगवेगळ्या पक्षांच्या अधिकृत उमेदवारांशिवाय तब्बल ५५१ अपक्ष उमेदवार असून प्रभाग क्र. १२५ मध्ये सर्वाधिक १२५ आहेत. तर ४० प्रभागांत अपक्षांची मोठी संख्या आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पसंती द्यावी की आपल्याच गल्लीतील किंवा इमारतीमधील उमेदवाराला मत द्यावे, असा प्रश्न मतदारांसमोर उभा राहणार आहे.
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकाकडे भावी आमदारकीचा उमेदवार म्हणून पाहिले जाते. त्यामुळे शिवसेना-मनसे, शिवसेना-भाजप, काँग्रेस-वंचित बहुजन अघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रमुख पक्षांबरोबरच यंदा अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. २२७ प्रभागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सुरुवातीला २,५१६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अर्ज छाननीत काही बाद झाल्याने तर काहींनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने सध्या निवडणूक रिंगणात १,७२९ उमेदवार आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये आपल्या पक्षातून तिकीट न मिळाल्याने बंडाचे निशाण फडकवत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
प्रभागात प्रभाव असल्याने ठरावीक समाजाचा पाठिंबा असल्याने हौसेखातर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्यांची मोठी संख्या असल्याने चित्र आहे. हे अपक्ष अनेक पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडवण्याची शक्यता आहे.

भाजपबरोबर अपक्षाची थेट लढत
दक्षिण मुंबईतील प्रभाग क्र. २२६ मध्ये भाजपचे उमेदवार ॲड. मकरंद नार्वेकर आणि अपक्ष उमेदवार तेजल पवार हे दोनच उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपविरुद्ध अपक्ष अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे कोण विजयी होणार, अपक्ष असलेल्या पवार यांना किती मते मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

मतांची विभागणी अटळ
महापालिकेच्या प्रभागात ४०-४५ हजार एवढे मतदार आहेत. आतापर्यंतची मुंबईतील मतदानाची आकडेवारी पाहिली तर सुमारे ५० टक्क्यांच्या जवळपास मतदान होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सात-आठ हजार मते घेणारा उमेदवार विजयी ठरतो; पण यंदा युती, महायुती आणि काँग्रेस-वंचितची आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘एकला चलो रे’ यामुळे निवडणूक रिंगणात उमेदवारांची मोठी संख्या आहे. त्यामळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार असून अपक्ष आणि इतर लहान पक्षांमुळे त्यामध्ये भर पडणार आहे. परिणामी, अनेक उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

प्रचारात रंगत येणार
पालिका निवडणुकीत अधिकृत उमेदवारांबरोबरच लहान पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा आहे, त्यांचे निवडणूक चिन्ह काय, ही माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधितांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी वेगवेगळे फंडे अवलंबले जाणार असल्याने प्रचारात रंगत येणार आहे.

सर्वाधिक अपक्षांची संख्या
प्रभाग क्र. - अपक्षांची संख्या

४० - ८
६४ - ८
७८ - ९
८९ - ८
९२ - ८
१२५ - ११
१३४ - ८
१४३ - १०
१६६ - ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com