ठाकरेंच्या शिलेदारांची 
महायुतीशी थेट लढत

ठाकरेंच्या शिलेदारांची महायुतीशी थेट लढत

Published on

ठाकरेंच्या शिलेदारांची
महायुतीशी थेट लढत

२४ ठिकाणी दुरंगी सामने अटीतटीचे ठरणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईत दुरंगी लढती रंगणार असून शिवसेना ठाकरे गट आणि महायुती थेट भिडणार आहेत. शहर आणि उपनगरांत २४ दुरंगी लढती लक्षवेधी ठरणार आहेत.

माजी महापौर मिलिंद वैद्य आणि माजी महापौर विशाखा राऊत या जागा शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाच्या आहेत. या उमेदवारांसमाेर महायुतीनेही ताेडीस ताेड उमेदवार दिले आहेत. प्रभाग क्र. १८२मधून माजी महापौर मिलिंद वैद्य यांना शिवसेना ठाकरे पक्षातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे राजन पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रभाग क्र. १०१ मधून माजी महापौर विशाखा राऊत या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचा सामना शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर यांच्याशी हाेणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे प्रभाग क्र. १२६ मधून लढत आहेत. ही जागा नार्वेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यांचा सामना अपक्ष उमेदवार तेजल पवार यांच्याशी होणार आहे. प्रभाग क्र. १०६ मध्ये भाजपचे उमेदवार आणि पालिकेतील ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्याविरुद्ध मनसेचे सत्यवान दळवी निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्र. १०७ मध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक नील सोमय्या आणि ‘वंचित’च्या वैशाली सकपाळ अशी थेट लढत होणार आहे. प्रभाग क्र. १३२ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांच्याशी शिवसेना ठाकरे गटाच्या क्रांती मोहिते यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. या दुरंगी लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या असून त्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट हे पूर्ण ताकद लावणार आहेत. या सर्व लढतींकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com