सर्वाधिक बंडखोर भाजप,उबाठात १३ बंडखोरांचे मोठे आव्हान
सर्वाधिक बंडखोर भाजप, ठाकरे गटात
१३ ठिकाणी मोठे आव्हान
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : इतर महापालिकेच्या तुलनेत मुंबईत बंडखोरीचे प्रमाण तसे कमी आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अनेक बंडखोरांनी आपली तलवार म्यान केली; मात्र तरीही अनेक प्रभागांत बंडखोर रिंगणात आहेत. सर्वाधिक आठ बंडखोर ठाकरे गटात, तर त्या खालोखाल भाजपमध्ये पाच जणांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांमुळे युती-आघाडीमध्ये मतविभाजनाचे संकट कायम आहे.
या वेळी पालिकेत उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षाला आव्हान देत, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्वतंत्र निवडणूक चिन्हासह हे बंडखोर रिंगणात उभे ठाकले आहेत. शिवसेनेने मनसेसोबत युती केली आहे. परिणामी, शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. यातील अनेक बंडखोरांनी थेट धनुष्यबाण हाती घेतले. ठाकरे यांच्याप्रमाणे भाजपने या वेळी शिवसेनेला सोबत घेत, त्यांच्यासाठी ९० जागा सोडल्या, त्यामुळे इच्छुक असलेल्या अनेकांनी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. भाजप नेत्यांनी प्रयत्नाअंती अनेक बंडोबांना थंड केले; मात्र तरीही पाच जागी पक्षाचे बंडखोरांनी थेट युतीलाच आव्हान दिले आहे. यातील अनेक बंडखोर हे प्रभावी आहेत. त्यांच्यामुळे लढती या तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी होण्याची शक्यता आहे. या ‘फ्रेंडली फाईट’चा फटका नेमका कोणाला बसेल, हे निकालात समोर येणार आहे.
...
बालेकिल्ल्यात बंड
अनेक बंडखोर हे प्रभावी आहेत. त्यांची जनमानसात पकड आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे लढतीचे गणित बदलून गेले आहे. यातील काही जण निवडून येऊ शकतात. विजयाचे गणित केवळ काही हजार मतांवर अवलंबून राहण्याची शक्यता असल्याने बंडखोर निर्णायक ठरू शकतात.
...
प्रमुख बंडखोर
शिवसेना (ठाकरे गट)
१. चंद्रशेखर वासुदेव वायंगणकर - प्रभाग ९५
२. कमलाकर नाईक - प्रभाग १६९
४. सूर्यकांत कोळी - प्रभाग १९३
५. संगीता विकास जगताप - प्रभाग १९६
६. श्रावणी देसाई - प्रभाग १९७
७. विजय इंदुलकर - प्रभाग २०२
८. दिव्या बडवे - प्रभाग २०३
...
मनसे
१. अनिशा माजगावकर - प्रभाग ११४
...
भाजप
१. दिव्या ढोळे - प्रभाग ६० (भाजप मुंबई सचिव होत्या )
२. नेहल अमर शाह - प्रभाग १७७
३. जान्हवी जगदीश राणे - प्रभाग २०५ (१५ वर्षे पक्षासोबत होत्या)
४. शिल्पा केळूसकर - प्रभाग १७३
५. जान्हवी पाठक - प्रभाग १८०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

