वसईतील जैवविविधतेचे जतन

वसईतील जैवविविधतेचे जतन

Published on

वसईतील जैवविविधतेचे जतन
‘निसर्गकोश’ उपक्रमाचा प्रारंभ

वसई ता. ४ (बातमीदार) : वसई तालुक्यातील जैवविविधता, वनसंपदा, जल स्रोत आणि पारंपरिक निसर्गज्ञान यांचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘वसई तालुका निसर्गकोश’ या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. हा उपक्रम धर्मसभा-विद्वत्संघ व आमची वसई सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे.
वेदमूर्ती धनंजय शास्त्री व पं. हृषीकेश वैद्य यांची ही संकल्पना असून, सुमारे ४० सदस्यांची तज्ज्ञ समिती कार्यरत आहे. पर्यावरण, वनस्पतीशास्त्र, इतिहास, भूगोल, लोकसंस्कृती, आयुर्वेद व भारतीय ज्ञानपरंपरा या क्षेत्रांतील अभ्यासक या निसर्गकोशाला शास्त्रीय अधिष्ठान देत आहेत.
आस्मानी आशांपेक्षा निसर्गाचे नियम, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा प्रकाश स्वीकारल्यास मानवता वाचू शकते. निसर्ग-मानव सहजीवन बहरेल असे यावेळी मार्गदर्शन करताना वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य यांनी सांगितले.
या उपक्रमातून निसर्गाची ओळख व्हावी यासाठी स्थानिक जैवविविधतेचे जतन होणार असून, विस्मरणात गेलेले पारंपरिक निसर्गज्ञान , लोकज्ञानही पुन्हा उजेडात येणार आहे, असे आमची वसई सामाजिक संस्थेचे ऋषिकेश वैद्य म्हणाले.


निसर्ग घटकांचा सखोल अभ्यास

वसई किल्ला परिसरातील वनस्पती अभ्यासाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. झाडांची नावे, औषधी गुणधर्म, स्थानिक उपयोग आणि पर्यावरणीय बदल यांची नोंद केली जात आहे. निसर्ग केवळ दगड-माती नसून तो अन्न, औषध आणि मानवी अस्तित्वाचा आधार आहे, हा संदेश या अभ्यासातून ठळकपणे देण्यात येत आहे. दर रविवारी वसईतील किल्ले, तलाव, समुद्रकिनारे, शेतीप्रदेश, वाड्या-वस्त्या व रस्त्याकडील निसर्ग घटकांचा सखोल अभ्यास पुढील सहा महिन्यांत केला जाणार आहे.

फोटो - 309

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com