मुंबईत ८४ तिरंगी, ११८ चौरंगी लढती

मुंबईत ८४ तिरंगी, ११८ चौरंगी लढती

Published on

मुंबईत ८४ तिरंगी, ११८ चौरंगी लढती
प्रतिष्‍ठेच्या जागांकडे साऱ्यांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईत प्रचाराला सुरुवात झाली असून, ८४ ठिकाणी तिरंगी तर ११८ ठिकाणी चौरंगी लढती अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. या तुल्यबळ लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या प्रभाग क्र २ मधून लढत आहेत. त्यांचा सामना शिवसेना ठाकरे पक्षाच्या धनश्री कोलगे, काँग्रेसच्या मेनका सिंह यांच्याशी लढत होणार आहे. ही लढत महत्त्वाची मानली जाते.
पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी, माजी आमदार यामिनी जाधव या प्रभाग क्र. २०९ मधून निवडणूक लढवित आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या हर्षदा सुर्वे, मनसेच्या हसिना माहीमकर आणि काँग्रेसच्या राफिया दामोदी यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. येथे होणारी ही चौरंगी लढत महत्त्वाची ठरणार आहे.
प्रभाग क्र. ५९मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आणि माजी नगरसेवक शैलेश फणसे यांचा सामना भाजपाचे योगिराज दाभाडकर आणि काँग्रेसचे जयेश सांधे असा होणार आहे. तर प्रभाग क्रमांक ६१मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या राजूल पटेल यांच्याशी शिवसेना ठाकरे पक्षाच्या सेजल, काँग्रेसच्या दिव्या सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आफरीन टोळे यांची तिरंगी लढत होत आहे. तशीच लढत प्रभाग ६२ मध्येही होत आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांच्याशी चौरंगी लढत होत आहे. आंबेकर यांच्याशी भाजपाचे रुपेश सावरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सैफ खान यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
प्रभाग क्र. ८७ मध्येही शिवसेना ठाकरे गटाच्या पूजा महाडेश्वर, भाजपाचे कृष्णा (महेश) पारकर, काँग्रेसचे प्रमोद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे संदीप उधारकर यांच्यात चौरंगी लढत होत आहे. प्रभाग क्र. १५१मध्येही चौरंगी लढत रंगणार आहे.

रवि राजा यांची प्रतिष्‍ठा पणाला
मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवि राजा हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना भाजपाने प्रभाग क्र. १८६ मधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जगदीश शिवालप्पी यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने मोहम्मद इरफान खान आणि कमलेश लालजी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या प्रभागात चौरंगी सामना रंगणार आहे. भाजपाचे रवि राजा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com