ठाणे शहरावर धुक्याची चादर

ठाणे शहरावर धुक्याची चादर

Published on

ठाणे शहर, ता. ५ (बातमीदार) : भल्या पहाटे हवेतील आल्हाददायी गारवा वाढला आहे. सभोवतालच्या परिसरांवर धुक्याची चादर पसरलेली आहे. डोळ्यांना हे दृश्य चांगले दिसत असले, तरी या धुक्यांमध्ये आरोग्य बिघडणारे घटकही लपलेले आहेत. त्यामुळे या वातावरणात सूर्य प्रकाशाआधी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. धुक्यामध्ये घातक कार्बन डाय-ऑक्साइड आणि धूलिकणांचे प्रमाण असल्याने हा धोका उद्‍भवला आहे. त्यामुळे भल्या सकाळी धुक्यात घराबाहेर पडण्याचे टाळण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. हवेत गारवा पसरल्याने काहीसे उल्हासाचे वातावरण पसरले आहे. सकाळच्या वातावरणात वॉक, फेरफटका मारणारे नागरिक उद्यान, ट्रॅक, रस्त्यांवर दिसू लागले आहेत. त्यांच्या अशा फिरण्यामागे आरोग्याची काळजी घेणारे कारण असले तरी सध्याच्या वातावरणामुळे लवकर फिरण्याने आरोग्याला बाधा पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवेत धुळीचे आणि कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण दिसून येत आहे. धुक्यामुळे हे घटक वर न जाता परिसरात पसरलेले असतात. तसेच धुक्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पडण्यास अडथळे येत असल्याने हवेतील हे इतर घटक गरम होऊन वर जाण्यास विलंब होतो. परिणामी, सकाळी हे घटक श्वासावाटे शरीरात जाण्याचे प्रमाण जास्त असते.

ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे, रस्ता रुंदीकरण, मेट्रोची कामे सुरू असल्याने हवेतील धुळीचे प्रमाण वाढले आहे. वाहनांच्या कोंडीमुळे वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड पसरत आहे. श्वसनविकार, ऍलर्जी, दमा, खोकला, घशाचे आजार, हृदयविकारासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे धुक्यातील घटक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

नागरिकांनी सूर्य उगवल्यानंतर घराबाहेर जायला हवे. कारण उन्हामुळे वातावरणातील कार्बनयुक्त फॉग वर निघून जात असल्याने वातावरण काहीसे शुद्ध होते. सूर्य उगावण्याच्या अगोदर घराबाहेर पडल्यास वातावरणातील कार्बनयुक्त कण आणि इतर प्रदूषित घटक मानवासह प्राणी, पक्ष्यांना बाधा पोहोचवतात. त्यामुळे श्वसनाचे आणि निमोनियासारखे फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. अभ्यासात महामार्गालगतच्या कुत्र्यांचे आयुर्मान घटल्याचे दिसून आले आहे.
- डॉ. युवराज कागिनकर, ज्येष्ठ पशुवैद्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com