चार माजी महापौरांची प्रतिष्ठापणाला

चार माजी महापौरांची प्रतिष्ठापणाला

Published on

चार माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला
मिरा-भाईंदर महापालिकेसाठी निवडणूक लढवणार
भाईंदर, ता. ५ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर पालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत पालिकेत महिलाराजच राहिलेले आहे. या काळात झालेल्या आठपैकी सहा वेळा महापौर बनण्याचा मान महिलांना मिळाला. त्यापैकी चार माजी महापौरांची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लागली आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार माजी महापौर विविध प्रभागांतून लढत देत आहेत. यातील तीन माजी महापौर भाजपकडून तर एक माजी महापौर शिवसेनेकडून नशीब अजमावत आहे. महापौरपद हे सर्वाधिक काळ महिलांकडे राहिले तर उपमहापौरपदी सर्वाधिक काळ पुरुषांकडे राहिले. आठपैकी सात वेळा पुरुष उपमहापौर राहिले आहेत; मात्र त्यापैकी केवळ भाजपचे हसमुख गेहलोत माजी उपमहापौर निवडणूक लढवत आहेत. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या कार्यकाळात गेहलोत उपमहापौरपदी विराजमान होते.
़़़़़़़़़ः------------------------------
निर्मला सावळे
मिरा-भाईंदर महापालिकेची २००२ मध्ये स्थापना झाल्यानंतर पहिल्या महापौर माजी आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या दिवंगत पत्नी मायरा मेंडोंसा झाल्या होत्या. त्यानंतर हा मान निर्मला सावळे यांना मिळाला. त्या त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत त्या आरपीआय कोट्यातून भाजपच्या चिन्हावर प्रभाग १८ मधून निवडणूक लढत आहेत.
----------------------
कॅटलीन परेरा
कॅटलीन परेरा माजी आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या कन्या आहेत. २०१२ मध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आल्या. महापौरपदी विराजमान झाल्या. २०१७ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्या शिवसेनेत गेल्या. शिवसेनेच्या विभाजनानंतर त्या शिंदे गटासोबत राहिल्या. आता शिवसेनेकडून त्या भाईंदर पश्चिम येथील प्रभाग आठमधून निवडणूक रिंगणात आहेत.
--------------------------
डिंपल मेहता
२०१७ मध्ये भाजपने महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्या वेळी महापौरपद महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस होती. अखेर भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांच्या गळ्यात ही माळ पडली. आता त्या पुन्हा एकदा मिरा रोड येथील प्रभाग १२ मधून निवडणूक लढवत आहेत.
----------------------------
ज्योत्स्ना हसनाळे
२०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपतना ज्योत्स्ना हसनाळे महापौर होत्या. डिंपल मेहता यांच्यानंतर महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झाले. त्यामुळे काशीमिरा येथील प्रभाग १४ मधून भाजपकडून निवडून आलेल्या हसनाळे यांची महापौरपदी वर्णी लागली. त्याच प्रभागातून त्या नशीब अजमावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com