रील्ससह घोषवाक्यांनी रंगली प्रचाराची रणधुमाळी!

रील्ससह घोषवाक्यांनी रंगली प्रचाराची रणधुमाळी!

Published on

रील्ससह घोषवाक्यांनी रंगली प्रचाराची रणधुमाळी!
पारंपरिक पद्धतीसह डिजिटल प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर
वाशी, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये यंदा डिजिटल माध्यमांचा प्रभाव विशेषतः वाढलेला दिसून येत आहे. पारंपरिक सभा, पदयात्रा, पोस्टर्स आणि प्रचार रथांच्या जोडीला सोशल मीडियावरील रील्स हा प्रचाराचा प्रभावी आणि चर्चेचा विषय ठरत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब शॉर्ट्स आणि एक्स (माजी ट्विटर) प्लॅटफॉर्मवर ३० ते ६० सेकंदांच्या लघु व्हिडिओंमुळे उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. तर कहो दिलसे… वाटीत चिवडा, मला निवडा!, अपक्ष, ठेवा लक्ष, नवा विचार, नवी व्यक्ती… विकासाची बना शक्ती अशा उखाणेवजा घोषणांनी गल्लोगल्ली प्रचाराचा उत्साह वाढवला आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता प्रचार केवळ भाषणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट शब्दांच्या करमणुकीसह डिजिटलमध्ये रूपांतरित झाला आहे. विशेष म्हणजे तरुण मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पक्ष आणि उमेदवार डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. या रील्सद्वारे स्थानिक समस्या, विकासकामे, उमेदवाराची भूमिका, विरोधकांवरील टीका अशा मुद्द्यांचे प्रभावी प्रचार केला जात आहे. प्रभावी संवाद, पार्श्वसंगीत, आकर्षक ग्राफिक्स, उपशिर्षक आणि लक्षवेधी कॅप्शनच्या मदतीने मतदारांचे लक्ष वेधले जाते. काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही थेट उमेदवारांच्या समर्थनार्थ रील्स तयार करत आहेत, तर काही अप्रत्यक्षपणे पक्षाची सकारात्मक प्रतिमा उभी करत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या बंधनामुळे डिजिटल प्रचारावरही लक्ष ठेवले जात आहे. नियमबाह्य, दिशाभूल करणाऱ्या किंवा आक्षेपार्ह रील्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष आणि उमेदवार नियमांचे पालन करून डिजिटल माध्यमांचा पूर्ण उपयोग करत आहेत.
...........................
मतदारांमध्ये कुतूहल
नवी मुंबईत शब्दांच्या करमणुकीचा प्रचारही जोरात दिसून येतो आहे. कहो दिलसे… वाटीत चिवडा, मला निवडा!, अपक्ष, ठेवा लक्ष, नवा विचार, नवी व्यक्ती… विकासाची बना शक्ती, अशा उखाणेवजा घोषणांनी गल्लोगल्ली प्रचाराचा उत्साह वाढवला आहे. रिक्षा, मोठे फलक, घराघरात पोहोचणारी पत्रके, चकचकीत डिजिटल फलक आणि भाषणातील शब्दखेळामुळे मतदारांमध्ये कुतूहल निर्माण होत आहे. विद्यमान नगरसेवक आपले विकासकामे शब्दांच्या माळेत गुंफून मांडत आहेत, तर माजी नगरसेवक दुर्लक्षित प्रश्नांचे टीकात्मक विश्लेषण करीत आहेत. अपक्ष उमेदवारांनीही स्वतंत्र अस्तित्व ठळक केले आहे. एकंदरीत, नवी मुंबईतील निवडणूक प्रचाराचा चेहरामोहरा बदलला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com