कल्याण डोंबिवली

कल्याण डोंबिवली

Published on

कल्याण-डोंबिवलीत यंदा प्रथमच पॅनेल पद्धतीने निवडणूक होत असून ही निवडणूक सत्ताधारी पक्षांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. पॅनेलमध्ये आपला टिकाव लागणार नाही, हे पाहून विरोधी पक्षातील अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरण्याच्या आधीच माघार घेतली आहे.

निवडणुकीच्या आधीच भाजपने ठाकरे व मनसेतील दिग्गज पदाधिकारी आपल्या गळाला लावून आपली ताकद वाढवली आहे. या पक्षप्रवेशाचा फटका शिवसेना शिंदे गटालादेखील बसला असून आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आता शिवसेनेला आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत आतापर्यंत शिवसेना व भाजपची युती राहिली असून शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली आहे; मात्र आता मोठा भाऊ होण्यासाठी भाजप आपली ताकद पणाला लावत आहे. तसेच आतापर्यंत महापौरपददेखील शिवसेनेकडे राहिले असून आता भाजपचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अपक्षांचा कौलदेखील या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. ९२ हून अधिक अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे असून सत्ताधारी की विरोधकांच्या मतांवर याचा फरक किती पडतो, हे पाहावे लागेल.

कल्याणमध्ये भाजपने उमेदवारी न दिल्याने संदीप गायकवाड यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com