राजकीय चढाओढीला आर्थिक सत्ताकारणची जोड

राजकीय चढाओढीला आर्थिक सत्ताकारणची जोड
Published on

राजकीय चढाओढीला आर्थिक सत्ताकारणची जोड
निवडणुकीत कोट्याधीश उमेदवारांमुळे रणांगण तापले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ ः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यंदा केवळ पक्षीय गणिते किंवा नेत्यांची ताकद नव्हे, तर आर्थिक सत्ताकारण देखील निर्णायक ठरणार आहे. उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर नजर टाकली असता, निवडणुकीच्या रिंगणात कोट्याधीश उमेदवार उतरले असल्याचे दिसून येते. यामुळे राजकीय चढाओढीसोबतच आर्थिक बळाची स्पर्धा प्रचारात रंगली तर ते वावगे ठरु नये.
कोट्यधीश उमेदवारांच्या ‘टॉप टेन’ यादीत भाजपचे उमेदवार व माजी नगरसेवक वरुण पाटील अव्वल ठरले आहेत. उद्योग व शेती व्यवसायाशी संबंधित असलेल्या पाटील यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या कुटुंबासह एकूण संपत्ती ३९ कोटी ७२ लाख ७६ हजार ४११ रुपये इतकी आहे.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी बिनविरोध निवड होत असताना, तर काही प्रभागांत थेट लढतींमध्ये आर्थिक ताकद हीच प्रचाराची प्रमुख शस्त्रे ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिका निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची असली, तरी यंदा ती राजकीय प्रतिष्ठे इतकीच आर्थिक सामर्थ्याची कसोटी ठरत असल्याचे चित्र आहे. प्रचार, संपर्क, आयोजन आणि व्यवस्थापन यासाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चामुळे आर्थिक ताकद असलेले उमेदवार अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय समीकरणांइतकीच आर्थिक सत्ता कुणाच्या बाजूने झुकते, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

बिनविरोधही कोट्यधीश
शिंदे गटाच्या ज्योती मराठे या बिनविरोध निवडून आल्या असून, त्यांच्या नावावर १३ कोटी ५१ लाख ४४ हजार ४६८ रुपये इतकी मालमत्ता आहे. त्यांचा मुलगा सूरज मराठे हेही निवडणूक रिंगणात असून, त्याच्याकडे एक कोटी ८३ लाख ८९ हजार ३४१ रुपये संपत्ती आहे. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे महेश पाटील, जे बिनविरोध निवडून आले असून, त्यांनी पत्नीसह २६ कोटी ३६ लाख ४७ हजार ६०९ रुपये संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. भाजपचे बिनविरोध निवडून आलेले जयेश म्हात्रे (७ कोटी ३ लाख) आणि दीपेश म्हात्रे (६ कोटी ३३ लाख) यांचाही समावेश आहे.

वारशांचे स्वबळ
भाजपचेच उमेदवार व माजी नगरसेवक मंगेश गायकर यांचे पुत्र श्यामल गायकर यांच्याकडे २६ कोटी ७४ लाख ६९ हजार ९४४ रुपये इतकी संपत्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचे चिरंजीव विक्रांत शिंदे हेही बांधकाम व्यावसायिक असून, त्यांच्या कुटुंबीयांसह एकूण संपत्ती १७ कोटी ८५ लाख ४२ हजार ७७९ रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.विशेष म्हणजे, मल्लेश शेट्टी यांचे पुत्र हरमेश शेट्टी, जे प्रथमच निवडणूक लढवत आहेत, त्यांनी केवळ एक लाख रुपये संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. तर शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे पुत्र हर्षल मोरे यांनी ५२ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वारसा विरुद्ध स्वबळ अशीही तुलना मतदारांमध्ये होत आहे.


वरुण पाटील (भाजप) ३९.७२
श्यामल गायकर (भाजप) २६.७४
महेश पाटील (भाजप) २६.३६
विक्रांत शिंदे (राष्ट्रवादी) १७.८५
हेमा पवार (भाजप) १५.२९
ज्योती मराठे (शिंदे गट) १३.५१
सचिन पोटे (शिंदे गट) १२.४९
राहुल दामले (भाजप) १२.१४
मल्लेश शेट्टी (शिंदे गट) १०.३६
निलेश शिंदे (शिंदे गट) ८.५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com