वाहतूक कोंडीतून सुटका

वाहतूक कोंडीतून सुटका

Published on

वाहतूक कोंडीतून सुटका
वडोदरा-मुंबई महामार्ग एप्रिलमध्ये सुरू होणार
महेंद्र पवार ः सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. ७ ः मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात येत असलेला वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे एप्रिल २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर मालवाहू ट्रक, कंटेनर, जड व अवजड वाहने प्रवास करतात. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था, वारंवार अपघात, दीर्घकाळ चालणारी वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळेचा अपव्यय मोठी गंभीर समस्या बनली आहे. काही वाहने ठाणे-बेलापूर, ठाणे-तळोजा यांसारख्या पर्यायी मार्गांचा वापर करीत असली तरी अनेक वर्षांपासून मार्गावरील अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणारा वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेचे आठ पदरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा महामार्ग एप्रिल २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती महामार्ग प्रबंधक सुहास चिटणीस यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रवास वेगवान, सुरक्षित, सुकर होणार आहे.
----------------------------------------------------------
कामाची सध्यःस्थिती
- तलासरी ते मोरबे (बदलापूरजवळ) १५६ किलोमीटर लांबीचा आहे. यातील पहिला टप्पा तलासरी- गंजाड- मासवण- शिरसाठ असा ८० किलोमीटरचा असून तलासरी ते गंजाड या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. गंजाड ते मासवण आणि मासवण ते शिरसाठ टप्प्याचे काम फेब्रुवारी-मार्च २०२६दरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील शिरसाठ ते अकलोली- वज्रेश्वरीमार्गे आमणे- भोज- रबे हा टप्पा एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
- हा महामार्ग समुद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील भिवंडीजवळील आमणे येथे वडोदरा- मुंबई एक्स्प्रेस वे समृद्धी महामार्गाला ओलांडून पुढे जाणार असून, त्या ठिकाणी भव्य आंतरबदल उभारण्यात येत आहेत. गंजाड येथे वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेसाठी मोठे इंटरचेंज उभारण्यात येत असून त्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
------------------------------------
महामार्गाचे फायदे
- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्डे, निकृष्ट काम, अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे वाहनचालकांचा धोकादायक प्रवास थांबणार
- एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर मुंबई ते गुजरातदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार
- पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, कासा, चारोटी परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका
- मुंबई- वडोदरा- दिल्ली प्रवासात साडेतीन ते पाच तासांची बचत
-----------------------------------
मार्गाची वैशिष्ट्ये
मार्गाची लांबी - ३७९
गावांची संख्या - ५१
प्रतितास वेग- १२० किलोमीटर
टोल प्लाझा - २४
मार्गिका - २४
भुयारी मार्ग - १,४७६
-----------------------------
मुंबई, पुणे, ठाणे या भागात जाण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सततची कोंडी, खराब रस्ते आणि अपघातांचा धोका यामुळे प्रवास त्रासदायक झाला होता. लवकरच वडोदरा- मुंबई एक्स्प्रेस वे सुरू झाल्यास प्रवास सुकर होईल.
- अभिजित देसक, सरपंच, गंजाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com