ठाण्यात या प्रभागात अटीतटीची लढत

ठाण्यात या प्रभागात अटीतटीची लढत

Published on

ठाण्यात १७ प्रभागांत अटीतटीच्या लढती
बंडखोरी, गटबाजी, कौटुंबिक राजकारणामुळे प्रचाराला रंगत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणे पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यात स्थानिक नेत्यांसह राज्यातील नेत्यांच्या सभा कार्यकर्ते मेळावे सुरु झाले आहेत. अशातच दुसरीकडे पालिकेच्या ३३ प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात ६४९ उमेदवार उतरले असले, तरी त्यापैकी किमान १७ प्रभागांमध्ये अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती पाहायला मिळणार आहेत. पक्षांतर्गत बंडखोरी, गटबाजी आणि कौटुंबिक राजकारणामुळे ठाणे महापालिकेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे पालिकेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. महायुतीसह महाविकास आघाडीकडून देखील प्रचाराचा जोर वाढविण्यात आला असून दोघांकडून विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीचा प्रचार करत आहे. अशातच काही प्रभागांमध्ये उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी थेट आपल्या पक्षाविरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी एकाच पक्षातील माजी नगरसेवक आमने-सामने ठाकले आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये शिंदे गटाकडून नम्रता घरत यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, तिकीट नाकारण्यात आल्याने रवि घरत यांनी अपक्ष म्हणून शिंदे गटाचे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांच्याविरोधात आव्हान उभे केले आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचे तीन वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांची थेट लढत मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्याशी होत आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये पक्षविरोधी कारवाईनंतर निलंबित करण्यात आलेल्या विक्रांत वायचळ यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. मात्र, माजी नगरसेवक भूषण भोईर यांचे तिकीट कापण्यात आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कोपरी परिसरात शिंदे गटाच्या नम्रता पमनानी आणि मनसेच्या राजेश्री नाईक यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपचे सुनेश जोशी, शिंदे गटाचे बंडखोर किरण नाकती आणि काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्याशी भाजपचे वैभव कदम यांचा सामना होत आहे.


राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी
१. प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिंदे गटाचे बाबाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे हिरा पाटील आमनेसामने आहेत. याच प्रभागात अजित पवार गटाच्या अनिता किणे आणि शरद पवार गटाच्या मनिषा भगत यांच्यातही लढत होत आहे.
२. मुंब्रा परिसरात दोन्ही राष्ट्रवादी गटांतील उमेदवार एकमेकांसमोर असून, काही ठिकाणी माजी नगरसेवकांच्या मुलींनाही थेट मैदानात उतरवण्यात आले आहे.भूषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com