घराणेशाहीचा उदोउदो!

घराणेशाहीचा उदोउदो!

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : महापालिकेच्या निवडणुकीत यंदा पॅनेल पद्धतीमुळे एकाच घरातील अनेक उमेदवारांच्या लढती होणार आहेत. एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात एकाच घरात तीन आणि त्यापेक्षा अधिक उमेदवारी दिली आहे. काही ठिकाणी उमेदवार नसल्याने नाईलाजास्तव उमेदवारी घ्यावी लागली आहेत.

ऐरोलीतील माजी नगरसेवक विजय चौगुले यांच्या घरात चार उमेदवारी देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी एकाच घरात तीन जणांकडे उमेदवारी दिल्याने त्यांच्या लढतीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे दोघेही स्वबळावर निवडणूक लढत आहेत. पहिल्यांदाच वनमंत्री गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे आव्हान मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जिंकणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. काही ठिकाणी उमेदवार नसल्यामुळे प्रस्थापित नगरसेवकांच्या घरातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, परंतु वाशी, नेरुळ, कोपरखैरणे या भागात शिवसेना आणि भाजपच्या माजी नगरसेवकांनी आपल्या घरातील सदस्यांच्या हट्टापायी अतिरिक्त जागा मागून घेतल्या आहेत.

आपल्यासोबत घरातील सदस्यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी असल्याने सर्व महत्त्वाच्या उमेदवारांची दमछाक होत आहे. ऐरोली मतदारसंघात सर्वाधिक जास्त उमेदवार एकाच घरातून असलेल्यांपैकी विजय चौगुले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यांच्या खालोखाल शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले माजी नगरसेवक एम. के. मढवी यांचा क्रमांक लागतो. या स्पर्धेत भाजपही मागे नाही. माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्यासोबत त्यांची पत्नी शशिकला, रबाळे भागातून माजी महापौर सुधाकर सोनवणे आणि त्यांच्या पत्नी रंजना या उमेदवार आहेत. दिघा प्रभागातून माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते आणि त्यांच्या पत्नी अपर्णा, आणि भावजय दिपा असे तीन जण निवडणूक लढवत आहेत. तुर्भे प्रभागातून माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी, त्यांचा मुलगा महेश आणि सून अबोली हे तिघे निवडणूक लढवत आहेत.

नवी मुंबईतील महत्त्वाच्या लढती
ऐरोली - प्रभाग क्रमांक २ ब
शिवसेना : विजय चौगुले, चांदणी चौगुले, ममित चौगुले, शुभम चौगुले

दिघा - प्रभाग क्रमांक - २ ब
भाजप : नवीन गवते, ॲड. अपर्णा गवते, दीपा गवते

ऐरोली - प्रभाग क्रमांक - ३ ड व ३ क
अनंत सुतार, शशिकला सुतार

रबाळे - प्रभाग क्रमांक ६
सुधाकर सोनवणे, रंजना सोनवणे

घणसोली - प्रभाग क्रमांक - ४
हेमांगी अंकुश सोनावणे, ऐश्वर्या अंकुश सोनावणे

घणसोली - प्रभाग क्रमांक - ७
मंदाकिनी म्हात्रे, मुलगा अनिकेत म्हात्रे

ऐरोली - प्रभाग क्रमांक - ५ क
एम. के. मढवी, विनया मढवी, तेजश्री करण मढवी

प्रभाग क्रमांक - ७
भाजप : लक्ष्मीकांत पाटील, मोनिका पाटील

बोनकोडे - प्रभाग - १३ अ
सागर नाईक, वैष्णवी वैभव नाईक (गणेश नाईक कुटुंबीय)

कोपरखैरणे - प्रभाग क्रमांक - ११
शिवराम पाटील, अनिता पाटील, पौर्णिमा ऋषीकेश पाटील

वाशी - प्रभाग क्रमांक - १७
प्रणाली लाड, सोनवी लाड

वाशी - प्रभाग क्रमांक - १८
दशरथ भगत, निशांत भगत, प्रिती संदीप भगत

तुर्भे - प्रभाग क्रमांक २०
भाजप : अमित अमृत मेढकर, सुजाता मेढकर, अंकुश अमृत मेढकर

तुर्भे - प्रभाग क्रमांक २०
शिंदे गट : सुरेश कुलकर्णी, महेश कुलकर्णी, अबोली महेश कुलकर्णी

सानपाडा - प्रभाग क्रमांक १९
शिंदे गट : सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, स्नेहा वास्कर

शिरवणे - प्रभाग क्रमांक २१
जयवंत सुतार, माधुरी सुतार

नेरुळ - प्रभाग क्रमांक २३
भाजप : सूरज पाटील, सुजाता पाटील

प्रभाग क्रमांक १२
रविकांत पाटील, भारती पाटील

नेरुळ - प्रभाग क्रमांक २४
नामदेव भगत, इंदूमती भगत

बेलापूर - प्रभाग क्रमांक २६
पूनम पाटील, अमित पाटील

सीवूड्स - प्रभाग क्रमांक २६
शिवसेना : दत्ता घंगाळे, अश्विनी घंगाळे

शिरवणे - प्रभाग क्रमांक २२
काशिनाथ पाटील, डॉ. प्रणाली पाटील

नेरुळ-जूईनगर - प्रभाग क्रमांक २२
रंगनाथ औटी, शशिकला औटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com