शिवसेना-मनसे शिवशक्तीचा कर्तव्यनामा जाहीर
नवी मुंबईचा लोकाभीमुख विकास
शिवसेना-मनसे शिवशक्तीचा कर्तव्यनामा जाहीर
वाशी, ता. ७ (बातमीदार) ः शहराचा विकास सध्या ठेकेदारांच्या सल्लानुसार आणि अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मर्जीनुसार होत आहे. मात्र यापुढे कोणतीही विकासकामे करताना प्रत्येक वॉर्डमध्ये नागरिकांची वॉर्डसभा घेऊन त्यांना पसंत असलेली कामेच केली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-मनसे शिवशक्तीचा कर्तव्यनामा बुधवारी (ता. ७) जाहीर करण्यात आला.
तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागला. मात्र आता या पुनर्विकासात राजकीय दलालांच्या टोळ्यांनी घुसखोरी करून सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले आहे. या दलालांनाही चाप लावण्याचे काम करण्यात येणार आहे. आरोग्य सेवेचे बजेट २३० कोटींवरून ५०० कोटींपर्यंत वाढून आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. ही केवळ आश्वासने नसून ठाकरेंचा शब्द आहे. हा दिलेला शब्द कर्तव्य म्हणून पाळला जाणार असल्याची ग्वाही शिवसेना आणि मनसेच्या वतीने आज देण्यात आली.
वाशी येथील मर्चंट जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात शिवसेना-मनसे शिवशक्तीचा कर्तव्यनामा जाहीर करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, मनसेचे विक्रांत माने, विलास घोणे आदी उपस्थित होते.
नवी मुंबई शहर हे सुनियोजित असले तरी महापालिकेची आरोग्य सेवा ही दुबळी आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना आरोग्य सेवेसाठी मुंबईवर अवलंबून राहावे लागते. मात्र शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आरोग्य सेवेचे बजेट दुपटीने वाढविण्यात येणार आहे. बंद असलेली सर्वच रुग्णालये तातडीने सुरू केली जाणार आहेत. ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र त्यातील एक टक्का पर्यटकही नवी मुंबईत येत नाही. त्यामुळे नवी मुंबई जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ निर्माण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा १११ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

