"उल्हासनगरात गुंडगिरी संपवण्याचा निर्धार : नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा थेट हल्ला"

"उल्हासनगरात गुंडगिरी संपवण्याचा निर्धार : नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा थेट हल्ला"

Published on

गुंडगिरी संपवण्याचा निर्धार
उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्र्यांची ग्वाही
उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) ः उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालू देणार नाही. इथे फक्त कायद्याचंच राज्य चालेल. देवा भाऊ गुंडगिरी कशी संपवतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही काळ उल्हासनगरचा विकास थांबलेला होता. मात्र आता हे चित्र बदलणार आहे. विकासाचे इंजिन पुन्हा वेग पकडणार असून, शहराला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत विकासाची गती वाढवण, हाच सरकारचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, आमदार सुलभा गायकवाड, धनंजय बोडारे यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भवितव्याचा कौल
ही निवडणूक उल्हासनगरच्या भवितव्याचा कौल देणारी आहे. जनतेने विकासाला जनादेश दिला. तर उल्हासनगरला आदर्श शहर बनवण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नागरिकांना मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि दर्जेदार सार्वजनिक सेवा देण हेच प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोठी गुंतवणुक
शहरातील उद्यानांच्या विकासासाठी ८८ कोटी रुपये, आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी २४ कोटी रुपये, टीएमटी बस सेवेसाठी १८ कोटी रुपये, सिंधी भवनासाठी ३.६१ कोटी रुपये, विविध सार्वजनिक इमारतींसाठी ८० कोटी रुपये, तसेच मनपा इमारतीच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या गुंतवणुकीमुळे शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत होतील. नागरिकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com