बदलापूर स्फोटाने हादरले; नियमांची पायमल्ली की प्रशासनाचे अपयश?

बदलापूर स्फोटाने हादरले; नियमांची पायमल्ली की प्रशासनाचे अपयश?

Published on

बदलापूर एमआयडीसीत अग्नितांडव
रिॲक्टरच्या स्फोटाने परिसर हादरला


बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : बदलापूर पूर्वेतील शिरगाव जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या पॅसिफिक ऑरगॅनिक या केमिकल कंपनीत सायंकाळी सातच्या सुमारास अचानक कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांचे आवाज झाले. काही क्षणांतच भीषण आगीचे उंच लोळ उसळले. केमिकल रिॲक्टरमधील स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. स्फोटांचे आवाज रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होते. आगीचे लोळ तब्बल पाच किलोमीटर अंतरावरून दिसत होते.

माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थिती गंभीर असल्याने अंबरनाथ व नंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. १० ते १२ अग्निशमन गाड्या व अग्निशमन दलाचे जवान व पाण्याचे टँकर चालक रात्रभर आगीशी झुंज देत होते. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्फोट होत असलेल्या केमिकल टँकरची आग विझवण्यात यश आले असले तरी कंपनीतील केमिकल ड्रम्समध्ये सतत होणाऱ्या स्फोटांमुळे आग पूर्णतः आटोक्यात येण्यात अडथळे येत असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.
----
नागरिकांना धुराचा त्रास
केमिकलमधून निघालेला दाट धूर दोन ते तीन किलोमीटर परिसरात पसरल्याने नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घशात खवखव असा त्रास जाणवू लागला. कंपनी मालकाने आत कोणताही कर्मचारी नसल्याचा दावा केला असला तरी आग पूर्णपणे विझल्यानंतरच त्याची खातरजमा होऊ शकेल, असे पोलिस व अग्निशमन दलाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com