आंबा, काजु मोहोरावर ढगाळ वातावरण, अवकळीचे सावट
ढगाळ वातावरणाने चिंता
आंबा, काजूचा मोहोर गळण्याचा धोका
मोखाडा, ता.८ (बातमीदार)ः आंबा, काजूच्या पिकांच्या आर्थिक आधाराची खरीप हंगामानंतर शेतकरी, फळबागयतदारांना अपेक्षा असते. मात्र, सातत्याने ढगाळ वातावणामुळे मोहोर गळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे फळबागयतदारांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
मोखाड्यात खरीप हंगामाचे पीक उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्नासाठी आंबा, काजूची लागवड केली आहे. खरिपाचे उत्पन्न पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असते. अशातच यंदा पावसाळा लांबल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून नुकसानीची काहीअंशी मदत मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. तर आंबा, काजूमुळे उत्पन्न मिळण्याची आस लागली आहे. मात्र, ढगाळ वातावरणाने मोहोर गळून जाण्याची भीतीने शेतकरी, फळबागायतदार धास्तावले आहेत.
-------------------------------------
पीक शेतकरी संख्या लागवड क्षेत्र
आंबा - २ हजार १६० ५५९ : ५० हेक्टर
काजू - २ हजार ३६ ४५१ : ४० हेक्टर
------------------------------
अवकाळी पावसामुळे बहरलेला आंबा गळून पडला. त्यानंतर खरीप हंगामात पाऊस लांबल्याने मोठे नुकसान झाले. सरकारने काहीअंशी भरपाई दिली. सध्या आंबा, काजूचा मोहोर जोमाने बहरला आहे. मात्र, ढगाळ वातावरण, पावसाची टांगती तलवार आहे.
- दिलीप गाटे, आंबा बागायतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

