ठाणे पोलिसांची निवडणूक रणनिती सज्ज
ठाणे पोलिसांचे निवडणूक ‘सुरक्षाकवच’ सज्ज
७८ कोटींचे ड्रग्ज, दोन कोटींची रोकड जप्त
ठाणे, ता. ८ : ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या चारही महापालिकांसाठी येत्या गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान होणार आहे. ही प्रक्रिया निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाने कंबर कसली आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल ७८ कोटींचे अमली पदार्थ आणि दोन कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ आणि आजपर्यंतच्या कालावधीत एमपीडीए कायद्यान्वये ४९ सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. एमपीडीए ४९ सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले. ३०७ जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले. ११ हजार ५०८ जणांवर विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. आयुक्तालयातील ३ हजार ६९ परवानाधारक शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
ड्रोनची नजर
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन आणि एरिया डॉमिनेशनवर भर दिला आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचे रूट मार्च काढले जात आहेत. विशेष म्हणजे मतदानादिवशी संपूर्ण शहरावर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
जप्तीचा मोठा आकडा
मुद्देमाल जप्त केलेली संख्या / रक्कम
अमली पदार्थ (ड्रग्ज) ७८ कोटी ३५ लाख ६० हजार ४५८ रु.
बेहिशोबी रोख रक्कम दोन कोटी १६ लाख ८९ हजार रु.
अग्निशस्त्रे (बंदुका) २७ (३७ जिवंत काडतुसांसह)
घातक शस्त्रे (चाकू/सुरे) १४२
अवैध मद्य (दारू) १३ हजार २१५ लिटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

