पदपथ नागरिकांना ये जा करण्याकरिता मोकळे कधी होणार ....

पदपथ नागरिकांना ये जा करण्याकरिता मोकळे कधी होणार ....

Published on

पदपथांचा श्वास कोंडला
फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे पादचाऱ्यांची तारेवरची कसरत
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील स्थानक परिसरातील रस्त्याचे पदपथ हे फेरीवाले, ठेलेवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. यामुळे नागरिकांना पदपथावरून ये-जा करतांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. तर, कल्याण डोंबिवलीमधील मुख्य रस्त्यांचे फुटपाथ कधी मोकळा श्वास घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कल्याण-डोंबिवली आणि टिटवाळा-आंबिवली स्थानक परिसरातील मुख्य रस्ते व चौकातील पदपाथांवर फेरीवाले आणि ठेलेवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यातच बेकायदेशीर दुचाकी पार्किंग आणि वाहनांची रहदारीमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालताना द्रविडी प्राणायम करावा लागत आहे. तसेच, पदपथ फेरीवाल्यांनी अडविल्याने पादचाऱ्यांना थेट रस्त्यावरुन मार्गक्रण करावे लागते. यावेळी वाहतुकीतून मार्ग काढताना पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. याशिवाय एखादा अपघात घडण्याचीही शक्यता असते.
प्रशासकीय यंत्रणा अनाधिकृत फेरीवाला हटाव मोहीम राबवते. परंतु, प्रशासनाची पाठ फिरताच पुन्हा अनधिकृत फेरीवाले पदपाथावर बस्तान थाटतात. यामुळे कल्याण-डोंबिवली पालिकेचे फेरीवाला पुनर्वसन धोरणाची अमंलबजावणी प्रत्यक्षात न होता कागदावरच राहिली असल्याने परिसरासह पदपथ फेरीवालामुक्त कधी होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तर, काही ठिकाणी दुकानदारांनी दुकानासमोर पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना अभय देत असल्याचे बोलले जाते. तर, या अनधिकृत फेरीवाल्यांना कुणाचा आशीर्वाद आहे, असा सवालही यानिमित्ताने विचारला जात आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातात निवडणूक प्रचारास रंगत आली असून या निवडणूक निकालानंतर सत्ताधारी हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोनची अंमलबजावणी करणार का येरे माझ्या मागल्या उक्तीप्रमाणे परिस्थिती जैसे थे राहणार, अशा चर्चा यानिमित्ताने जाणकाराकडून होत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष
कल्याण स्थानक परिसरातील महम्मद अली चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर अनाधिकृत फेरीवाले, ठेलेवाले, हातगाड्या यांचे बस्तान आणि रस्त्यावर होणारी बेकायदेशीर वाहनांची पार्किंग यामुळे अबाल वृध्दांना पदपाथ चालण्यासाठी राहात नाही. हे पदपथ प्रशासनाने मोकळे करून दिले पाहिजे, असे सुरेखा मोरे यांनी सांगितले. तर, डोंबिवली स्थानक परिसरातील रस्त्यावर वाहनांची रहदारी आणि पदपाथावर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात अनेकदा आंदोलन होऊन देखील प्रशासनाने कायमस्वरुपी बंद करु शकले नसल्याचे दुर्दैव म्हणावे लागेल असे प्रदिप गायकवाड यांनी म्हंटले आहे.

कारवाई होते
यासंदर्भात उपायुक्त समीर भुमकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. तसेच क प्रभाग सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, फेरीवाल्यांवर कारवाई होते, असे उत्तर दिले.

या रस्त्यांवर फुटपाथ दिसनासे
कल्याण स्थानक परिसरातील महम्मद अल्ली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत रोहिदास महाराज चौक आणि सहाजानंद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे फुटपाथ तर डोंबिवलीमधील फडके रोड, मानपाडा रस्ता, नेहरू रोड, रामनगर परिसर, महात्मा फुले रोड, दीनदयाळ रोड, नवा पाडा, कुंभारखान पाडा रस्ता, टिटवाळा स्टेशन स्थानक ते महागणपती रोड परिसर, अंबिवली स्थानक ते मोहने गेट रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com