पालिकेत निवडणुकीत श्रीमंतांची प्रतिष्ठा पणाला

पालिकेत निवडणुकीत श्रीमंतांची प्रतिष्ठा पणाला

Published on

पालिका निवडणुकीत श्रीमंतांची प्रतिष्ठा पणाला
११४ उमेदवार कोट्यधीश; परिषा सरनाईक सर्वात श्रीमंत!

ठाणे, ता. ८ : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय रणांगण चांगलेच तापले असून, ६४९ उमेदवारांचे भवितव्य आता मतदारांच्या हाती आहे. या निवडणुकीत राजकीय ताकदीसोबतच आर्थिक ताकदही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, रिंगणातील ११४ उमेदवार कोट्यधीश आहेत. यामध्ये सत्ताधारी शिंदे गटाच्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक असून, परिषा सरनाईक या ३८१ कोटींच्या मालमत्तेसह अव्वल स्थानी आहेत.

ठाणे पालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, प्रचाराचा धुरळादेखील उडाला आहे. अशातच निवडणुकीत उभ्या राहिलेल्या ६४९ उमेदवारांपैकी ११४ उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दाखल करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीवरून समोर आली आहे. यात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल ३८१ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता दाखवली असून, त्या ठाणे महापालिका निवडणुकीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत.

पक्षनिहाय श्रीमंतीचे दर्शन
शिवसेना (शिंदे गट) : सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांचा भरणा याच पक्षात आहे. यात मनाली पाटील (६१ कोटी), कल्पना पाटील (३२ कोटी), संजय भोईर (२९ कोटी) यांचा समावेश आहे.
भाजप : भाजपमध्ये प्रतिभा मढवी (४३ कोटी), अमित सरय्या (२६ कोटी) आणि स्नेहा आंब्रे (१६ कोटी) हे प्रमुख कोट्यधीश आहेत.
इतर पक्ष : ठाकरे गटाच्या महेश्वरी तरे (२३ कोटी), शरद पवार गटाचे हिरा पाटील (२१ कोटी), मनसेच्या रेश्मा पवार (१७ कोटी) आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला (९.५ कोटी) यांनी आपली मालमत्ता जाहीर केली आहे.

सर्वात गरीब उमेदवार कोण?
एकीकडे ३८१ कोटींचे मालक रिंगणात असताना दुसरीकडे मुंब्रा येथील शरद पवार गटाचे उमेदवार खांचे मोहम्मद जैद अतिक खांचे यांनी सर्वात कमी संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ २० हजार ५०२ रुपये इतके आहे.

श्रीमंत उमेदवारांची टॉप यादी
उमेदवार पक्ष मालमत्ता (अंदाजे)
परिषा सरनाईक शिवसेना (शिंदे गट) ३८१ कोटी
बाबाजी पाटील शिवसेना (शिंदे गट) १२६.६६ कोटी
मंदार केणी शिवसेना (शिंदे गट) १०५ कोटी
जयश्री फाटक शिवसेना (शिंदे गट) ६५.२५ कोटी
हनुमंत जगदाळे शिवसेना (शिंदे गट) ६३.४४ कोटी
प्रमिला केणी अपक्ष ६१.६८ कोटी
नंदा व कृष्णा पाटील भाजप ५१.२० कोटी
नंदिनी विचारे शिवसेना (ठाकरे) ४१.८७ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com