नवी मुंबईचे स्वतःला मालक समजणाऱ्यांना पाय उतार करा

नवी मुंबईचे स्वतःला मालक समजणाऱ्यांना पाय उतार करा

Published on

मालक समजणाऱ्यांना पाय उतार करा
उपमुख्यमंत्री शिंदे यांची नाईकांवर अप्रत्यक्ष टीका

वाशी-नेरुळ, ता. ८ (बातमीदार) ः नगरविकास विभाग माझ्याकडे असून नवी मुंबईच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. परंतू जे नवी मुंबईला स्वतःचे मालक समजतात अशांना पायउतार करा, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. नवी मुंबईतील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.

नवी मुंबई शिवसेनेतर्फे आज बेलापूर विधानसभा मतदार संघात उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत एकनाथ शिंदे बेलापूर पासून ते वाशीपर्यंत सहभागी झाले होते. या प्रसंगी शिंदे यांनी बेलापूर येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅलीदरम्यान नवी मुंबईतील भाजपच्या नेत्यांचे नाव न घेता टीका केली.
आपण जनतेचे सेवक आहोत. मालक नाहीत. गेले अनेक वर्षे स्वतःला मालक समजून नवी मुंबईत भ्रष्टाचार केला आहे. विकासाचा अजेंडा राबवण्याऐवजी स्वार्थाचा अजेंडा राबवला आहे. अशी घणाघाती टीका शिंदे यांनी केली.

गुंडगीरी खपवून घेतली जाणार
ही निवडणूक पारदर्शक आणि दहशतविरहीत व्हायला हवी. कोणाची गुंडगीरी खपवून घेतली जाणार नाही, असे वक्तव्य शिंदे यांनी पोलिसांना उद्देशून केले. आपल्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण विभाग असल्याचा पुनरुच्चार करीत शहराच्या विकासासाठी झोपडपट्टी पुर्निविकास, कल्स्टर योजना, पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. ही निवडणूक फक्त मतदानापुरती मर्यादित नसून आता नवी मुंबईच्या विकासांचा फैसाला करणारी ठरणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. या रोड शोमध्ये खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा, बेलापूर ते वाशी दरम्यानचे शिवसेनेचे उमेदवार सहभागी झाले होते.
-----------------------------------
पुन्हा लाडक्या बहिणींना साद
कोणीही आला तरी लाडकी बहिण योजना बंद पडू देणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले. ही योजना आपण सुरु केली असून बहिणींना लखोपती करणार. ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्या उमेदवाराचा निवडणूकीत नंबर पहिला अशी घोषणाही शिंदे यांनी केली.
------------------------------------
या भागात झाली रॅली
बेलापूर येथील सीएनजी पंप येथून सुरू होऊन बेलापूर गाव, आयकर कॉलनी मार्गे दारावे गाव, नेरुळ बस डेपो, अयप्पा मंदिर, शिवसेना शाखा क्रमांक ११ व १५, शिरवणे गाव, वखार मार्गे राजीव गांधी ब्रिज, नेरुळ (पश्चिम) सेक्टर ८ स्टेशन रोड, सेक्टर १० गावदेवी मैदान, सेक्टर ६, सेक्टर १८, सिवूड मॉल, सेक्टर ५०, गणेश मैदान, सेक्टर ४८, करावे गाव, सेक्टर ४, जुईनगर मार्गे सानपाडा पामबीच रोडने मोराज, वाशी येथे गावदेवी मंदिराजवळील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे या रोड शोचा समारोप झाला.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com