कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा हायटेक प्रकल्प

कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा हायटेक प्रकल्प

Published on

पनवेल, ता. ८ (बातमीदार) : कळंबोली परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे सांगत पंकजा मुंडे यांनी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारे हायटेक प्रकल्प राबवण्याचे आश्वासन दिले. तसेच या परिसरात होणाऱ्या प्रदूषणावर कठोर कारवाई करून वचक बसवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ, विकासाभिमुख आणि पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी कळंबोली येथे बुधवारी (ता. ७) प्रचार रॅली व चौक सभा घेतली. या रॅलीला शेकडो महिलांची उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजप जिल्हाप्रमुख अविनाश कोळी, बाळासाहेब पाटील, तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते. कोणताही भव्य स्टेज, हारतुरे किंवा बडेजाव न करता ट्रेलरच्या प्लॅटफॉर्मवरून, मोबाईलच्या लाईटचा प्रकाश वापरून ही साधी, पण प्रभावी कोपरा सभा पार पडली.

फटाक्यांवरून सुनावले
मी पर्यावरण मंत्री आहे. पर्यावरण जपणे, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे येथे फटाके वाजवून माझे स्वागत केले गेले, ही गोष्ट मला आवडली नाही, असे स्पष्ट वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com