बीएड, एलएलबीच्या सीईटीची नोंदणी सुरू

बीएड, एलएलबीच्या सीईटीची नोंदणी सुरू

Published on

बीएड, एलएलबीच्या सीईटीची नोंदणी सुरू
मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा

मुंबई, ता. ८ ः राज्यातील विविध महाविद्यालयातील बी. एड. (जनरल व स्पेशल), बी. एड. (इलेक्ट.) आणि तीनवर्षीय एलएलबी या दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटीच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही नोंदणी २३ जानेवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती आज सीईटी सेलकडून देण्यात आली.
बी. एड व तीनवर्षीय एलएलबीच्या या अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या संभाव्य परीक्षा अनुक्रमे २७ मार्च २०२६ ते २९ मार्च आणि १ एप्रिल २०२६ ते २ एप्रिल यादरम्यान होणार आहेत. या परीक्षांच्या तारखांमध्ये ऐनवेळी बदल झाल्यास त्यासाठीची माहिती सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. तसेच आतापर्यंत सीईटी सेलने जाहीर केलेल्या सर्व सीईटी परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिकाही आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून सीईटीकडून इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या नोंदणीलाही लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. दरम्यान, २०२५च्या बी. एड. सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १,१६,५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तीनवर्षीय एलएलबी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये ९४,५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. काही अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात या एलएलबीसाठी उपलब्ध असलेल्या जागांवर प्रवेश झाले होते.
...
परीक्षेच्या तारखा
सीईटी------------नोंदणीची अंतिम तारीख------------सीईटी परीक्षेची संभाव्य तारीख
महा. बी.एड. सीईटी------------२३ जानेवारी------------२७ मार्च २०२६ ते २९ मार्च
महा. एलएलबी (तीनवर्षीय )------------२३ जानेवारी------------१ एप्रिल २०२६ ते २ एप्रिल
...
मागील तीन वर्षातील नोंदणी केलेले विद्यार्थी
प्रवेश परीक्षा २०२३-२४------------२०२४-२५------------२०२५-२६
बी. एड. ७९,९८४------------७९,०८३ ------------१,१६,५८५
एलएलबी (तीनवर्षीय) ७६,४२५------------८०,१२५------------९४,५०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com