मुंबईत पहिले आरोग्य विद्यापीठ ः राहुल शेवाळे
मुंबईत पहिले आरोग्य विद्यापीठ ः राहुल शेवाळे
पाच वैद्यकीय रुग्णालयांचाही प्रस्ताव
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आरोग्य विषयाला प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी मुंबईत पहिल्यांदाच आरोग्य विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव जाहीर केला. यासोबतच मुंबई महापालिकेअंतर्गत शहर व उपनगरात पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे आरोग्य विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून, पालिका निवडणुकीत सत्ता आल्यास मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत व्यापक सुधारणा केल्या जातील, असे शेवाळे यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. सध्या मुंबईत पालिकेअंतर्गत केईएम, नायर, सायन आणि कुपर ही चार प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. मात्र, उपनगरात पालिकेचे एकही वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने, गोवंडी शताब्दी रुग्णालयापासून उपनगरात वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात केली जाईल, असे शेवाळे यांनी सांगितले. महापालिकेअंतर्गत एमआरआय व सुपरस्पेशालिटी सुविधा चालवताना तसेच त्यांच्या देखभालीस अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले. पालिकेच्या दरात आरोग्य सेवा देताना ही मोठी अडचण ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केईएम, नायर व सायनसारख्या रुग्णालयांतून देशातील नामवंत डॉक्टर घडले असून, प्रस्तावित पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमधून भविष्यात मोठ्या प्रमाणात डॉक्टर उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
...
व्यवस्थापन सुलभ होईल!
गोवंडी शताब्दी रुग्णालयाला दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपयांचा तोटा होत असून, मनुष्यबळाच्या दृष्टीने ही रुग्णालये पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर चालविल्यास व्यवस्थापन सुलभ होईल, असे शेवाळे यांनी सांगितले. यासाठी विविध संस्थांकडून स्वारस्य मागवण्यात आले असून, लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

