झोपडपट्टयांच्याच जागांवर पुनर्विकास, वंचितने दिली हमी

झोपडपट्टयांच्याच जागांवर पुनर्विकास, वंचितने दिली हमी

Published on

झोपडपट्ट्यांच्याच जागांवर पुनर्विकास
वंचितचा लोकआवाजाचा जाहीरनामा

मुंबई, ता. ८ ः मुंबईतील पात्र झोपडपट्ट्यांचा त्याच जागेवर पुनर्विकास करण्यासोबत त्यांना स्पष्ट व सुरक्षित कायदेशीर ताबा आणि जागेचे मालकी हक्क प्रदान करण्याची हमी आज वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात दिली आहे. पुढील पाच वर्षांत मुंबईतील मराठी कुटुंबांसाठी १.५ लाख परवडणारी घरेही बांधण्याचे आणि त्यात केवळ मराठी कुटुंबे आणि झोपडपट्टीतील रहिवाशांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
यासोबतच महापालिकेचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक करून त्यातून न्याय आणि संधी सर्वांना समान उपलब्ध करून देणे, त्यात अनुचित जातींसाठी १० टक्के, तर अनुसूचित जमातींसाठी ५ टक्क्यांची राखीव तरतूद करण्याची हमी वंचितने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहे. ‘एक संधी वंचित’ला म्हणत लोकआवाज, लोकसंकल्प, लोकशक्तीचा सर्वांगीण विचार करण्यासोबतच मुंबईतील नागरिकांना २४ तास अखंड पाणीपुरवठा, आरोग्यासोबत शिक्षण आणि घरांसाठी ठोस आश्वासने देण्यात आली आहेत. वंचितने मुंबईतील सर्व रखडलेले, एसआरए प्रकल्प ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करून आणि विलंब करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. महापालिकेची जमीन भाडेघरांसाठी व परवडणाऱ्या घरांसाठी प्राधान्याने वापरली जाईल, विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) कुटुंबांसाठी पुनर्वसनासाठी किमान ५०० चौ. फूट क्षेत्रफळाची घरे सुनिश्चित केली जाण्याचेही आश्वासन वंचितने दिले आहे.
...
अन्य आश्वासने
- समान पाणीवाटपावर भर देणार
- पाण्याच्या दरात ३० टक्के कपात करणार
- सर्व शहरांत किमान प्रतिव्यक्ती १३५ लिटर प्रतिव्यक्ती प्रतिदिन पाणी देणार
- मिठी नदीसह सर्व जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणार
- उपनगरातील वीजवपुरवठा अदाणींकडून परत बेस्टकडे आणणार
- बंद पडलेल्या शाळांचे पुनरुज्जीवन
- बंद पडलेली ग्रंथालये पुन्हा सुरू करणार
- पालिका रुग्णालयांत रिक्त पदांची भरती करणार
- झोपडपट्टी आणि अनधिकृत वसाहतींसाठी मोबाईल हेल्थ व्हॅन्स सुरू करणार
- सर्व सफाई कर्मचाऱ्यांना थेट स्थायी नोकरी जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com