केंद्र सरकारकडून ‘समग्र शिक्षा ३.०’ तयारी पुण्यातील बाभळेवाडीच्या शाळेचे झाले कौतुक
केंद्र सरकारकडून ‘समग्र शिक्षा ३.०’ची तयारी
दिल्लीतील बैठकीत पुण्यातील बाभळेवाडीच्या शाळेचे कौतुक
मुंबई, ता. ९ : केंद्र सरकारकडून देशातील शालेय शिक्षणासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या समग्र शिक्षा अभियानाचा तिसरा टप्पा ‘समग्र शिक्षा ३.०’ची केंद्र सरकारकडून तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षानंतर या अभियानात राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना आणि शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेसोबत सरकारी शाळांतील प्रवेश, शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादीसंदर्भात अनेक बदल होणार आहेत.
समग्र शिक्षा ३.०ची अंमलबजावणी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ९) दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ‘रीइमॅजिनिंग समग्र शिक्षा’ या शीर्षकाखाली ‘समग्र शिक्षा ३.०’ची बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील जिल्हा परिषदेच्या बाभळेवाडी या आदर्श शाळेने निर्माण केलेल्या मॉडेलचा गौरव करण्यात आला तसेच देशातील सर्व राज्यांत हे मॉडेल विकसित करण्यासाठी भर देण्यावरही चर्चा झाली. समग्र शिक्षा अभियान ३.०मध्ये प्रामुख्याने सरकारी शाळांमधील प्रवेश, शालेय गुणवत्ता, शिक्षकांची क्षमता वृद्धी, त्यांचे प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण आणि परिणामाधारित शिक्षण त्यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करणे, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय), अभ्यासक्रमात समावेश करणे इत्यादी महत्त्वाच्या घटकांचा समावेश केला जाणार आहे. या बदलांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच समग्रच्या योजनेसाठी प्रशासन व्यवस्था, पायाभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचे हक्क अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेली उदयोन्मुख आव्हाने, सर्वोत्तम पद्धती आणि प्राधान्यक्रमातील हस्तक्षेप यांवर चर्चा करण्यात आली.
..
‘सीएसआर’च्या माध्यमातून उभारले मॉडेल
पुणे जिल्हा परिषदेच्या बाभळेवाडीच्या शाळेचा (वाबळेवाडी, शिरूर, पुणे) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या बैठकीत गौरव करण्यात आला. या शाळेने ‘आदर्श शाळा’ म्हणून जगभरात ओळख निर्माण केली. आजूबाजूच्या ३० कि.मी. परिसरातील पालक आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी या शाळेत रांग लावतात. या शाळेने ‘सीएसआर’च्या माध्यमातून उभे केलेले मॉडेल आणि त्या शाळेच्या विकासाप्रमाणे देशातील सर्व राज्यांमध्ये शाळांनी आपला विकास केला पाहिजे, असे आवाहन दिल्लीतील बैठकीत शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

