अभियांत्रिकी, फार्मसीची 
सीईटी नोंदणी आजपासून

अभियांत्रिकी, फार्मसीची सीईटी नोंदणी आजपासून

Published on

अभियांत्रिकी, फार्मसीची
सीईटी नोंदणी आजपासून
मुंबई, ता. ९ ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) व ॲग्रीकल्चरल एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी समूह) आणि मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए/ एमएमएस) या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस शनिवारी (ता. १०) सुरुवात होणार आहे. ही नोंदणी १२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.

या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. २०२५च्या एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) या प्रवेश परीक्षेत चार लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी, एमएचटी सीईटी (पीसीबी समूह) या प्रवेश परीक्षेत तीन लाख एक हजार ७२ विद्यार्थ्यांनी तर एमबीए/एमएमएस सीईटी या प्रवेश परीक्षेत एक लाख १६ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
-------
प्रवेश परीक्षेच्या दोन संधी
राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या (मेन) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही मिळाव्यात म्हणून या वर्षापासून सीईटी कक्षाने या वर्षापासून एमएचटी सीईटी (पीसीएम समूह), एमएचटी सीईटी (पीसीबी समूह) आणि एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक, तर दुसरी ऐच्छिक असेल. दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील.
--
प्रवेश परीक्षेच्या दोन्ही संधींच्या तारखा
एमएचटी सीईटी (पीसीएम व पीसीबी समूह) प्रथम संधीची प्रवेश परीक्षा ११ एप्रिल ते २६ एप्रिलदरम्यान होईल. द्वितीय संधीची प्रवेश परीक्षा १० ते १७ मे दरम्यान होईल. एमबीए/ एमएमएससाठी प्रथम संधीची प्रवेश परीक्षा ६ ते ८ एप्रिलदरम्यान होणार आहे. द्वितीय संधीची प्रवेश परीक्षा ९ मे रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com