उभ्या कंटेनरचे आगीने नुकसान
उभ्या कंटेनरचे आगीने नुकसान
महामार्गावरील घोळ टोलनाक्यावरील घटना
कासा, ता.१०(बातमीदार)ः गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला आग लागली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोळ टोलनाक्याजवळ शुक्रवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास ही घटना घडली होते.
आगीचे लोळ दिसताच परिसरातील नागरिकांनी तसेच इतर वाहनचालकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. याची माहिती डहाणू येथील अदानी कंपनीच्या अग्निशमक दलाला देण्यात आली. तासाभराने घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली होती. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, घटनेत कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावर कायमस्वरूपी अग्निशामक व्यवस्था नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गावर सातत्याने अपघात, आगीच्या घटना घडत असताना तातडीच्या सेवांचा अभाव असल्याने वाहनचालकांमध्ये संताप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

