एसटीतून कोकण दर्शनाची संधी

एसटीतून कोकण दर्शनाची संधी

Published on

एसटीतून कोकण दर्शनाची संधी
माघी गणेशोत्सवानिमित्त पालघर विभागाचा उपक्रम
पालघर, ता. १० : एसटीच्या पालघर विभागाकडून गणेशभक्तांसाठी कोकण दर्शन यात्रा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त कोकणातील वैभव आणि धार्मिक स्थळांची सफर करण्याची संधी जिल्हावासीयांना मिळणार आहे.
गणेश जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाने पर्यटक आणि भाविकांसाठी कोकण दर्शन पॅकेज टूरची विशेष पर्वणी आणली आहे. पालघर, सफाळे, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर आणि नालासोपारा अशा आठ आगारांतून कोकण दर्शनाकरिता या बस निघणार आहेत. किमान ४० प्रवाशांचा गट तयार झाला, तर त्या गटासाठी एसटीमार्फत बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या सवलतींचा पूर्ण लाभ मिळणार आहे.
------------------------------
या पर्यटनस्थळांना भेट
मुरूड-जंजिरा, रायगड किल्ला संगमेश्वर, मार्लेश्वर (गुहेतील शिवमंदिर), गणपतीपुळे अशा देवस्थानांच्या यात्रेचे नियोजन आहे. बसचा मार्ग मुरूड जंजिरा-माणगाव-रायगड-संगमेश्वर-मार्लेश्वर-गणपतीपुळे आणि परतीचा प्रवास असा असणार आहे.
--------------------------------
समूह योजनेसाठी हा उपक्रम असून, जिल्ह्यातील भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि स्वस्त दरात सेवा देणे, एसटीचे कर्तव्य आहे.
- कैलास पाटील, विभाग नियंत्रक, पालघर विभाग
------------------------------------
तिकीटदर (प्रति प्रवासी)
आगार - पुरुष सवलतदार (योजना)
वसई - २,०११ - १,००६
नालासोपारा -२,०११ - १,००६
अर्नाळा - २,०७१ - १,०३६
पालघर - २,४४५ - १,२२३
बोईसर - २,४६५ - १,२३३
जव्हार - २,४६२ - १,२३१
सफाळे - २,४२५ - १,२१३
डहाणू - २,५१५ - १,२५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com